north korea kim jong un executes general piranha filled fish tank | उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उननी जनरलना फेकलं पिराना माशांच्या तलावात
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उननी जनरलना फेकलं पिराना माशांच्या तलावात

नवी दिल्लीः उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी जनरलना हिंस्र पिराना माशांच्या तलावात फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जनरल हे जोंग यांच्याविरोधात कटकारस्थान रचत असल्याचं त्यांना संशय होता. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतल्या आपल्या दूतांसह पाच अधिकाऱ्यांची निर्दयीपणे हत्या केली. किम जोंग ऊन यांची ही क्रूर कृत्ये नेहमीच चर्चेत राहिली आहेत. अशा प्रकारांमुळे प्रत्येक स्तरावरून त्यांच्यावर टीका होत असते.

किम जोंग यांनी प्योंगयोंगमध्ये मोठा तलाव निर्माण केला आहे. या तलावात हिंस्र माशांना पाळलं आहे. किमला जनरल कटकारस्थान करत असल्याचा संशय आल्यानंतर त्यांनी त्याला तलावात फेकले. पिराना हा हिंस्र प्रजातीचा मासा आहे. या माशाचे दात अतिशय तीक्ष्य असतात. काही मिनिटांतही तो कोणत्याही प्राण्याची चिरफाड करून त्याला गिळंकृत करू शकतो.

पिराना माशाच्या 60 प्रजाती वेगवेगळ्या देशांत आढळतात. किम जोंग ऊन यांनी 1965मध्ये आलेल्या जेम्स बाँड चित्रपटापासून प्रेरणा घेऊन हे कृत्य केलं आहे. लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठीच किम जोंग ऊन अशा प्रकारची कृत्ये करत असल्याचीही चर्चा आहे. 


Web Title: north korea kim jong un executes general piranha filled fish tank
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.