शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

अमेरिकन नागरिकांचा असहकार, संसर्गाची माहिती देण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 03:55 IST

अमेरिकन प्रशासनाने दोन आठवड्यांत ५ हजार ३४७ रुग्ण वा रुग्ण असण्याची शक्यता असलेले लोक यांच्याकडून विविध माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या ज्या न्यूयॉर्क शहरात आणि आसपासच्या परिसरात ‘कोविड-१९’चा सर्वाधिक संसर्ग झाला आहे, तेथील लोक आपल्या आजाराची माहितीच प्रशासनाला द्यायला तयार नाहीत. त्यामुळे संसर्गाला आळा घालण्यात अडचणी येत आहे.लोक आजारांची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहेत. अमेरिकन प्रशासनाने दोन आठवड्यांत ५ हजार ३४७ रुग्ण वा रुग्ण असण्याची शक्यता असलेले लोक यांच्याकडून विविध माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यात केवळ ३५ टक्के लोकांनी ते कोणाकोणाला भेटले होते, त्यांची नावे काय आहेत, ते कुठे राहतात, याची माहिती प्रशासनाला दिली. म्हणजेच तब्बल ६५ टक्के लोकांनी नीट माहिती देण्यास नकार दिला, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात नमूद केले आहे.केवळ ३५ टक्के लोकांनीच माहिती देणे, ही बाब चिंताजनक आहे. इतक्या अपुऱ्या माहितीतून संसर्ग कोणामुळे झाला असेल, हे समजणे अशक्य असते, असे तेथील तज्ज्ञांनी म्हटले आहे. सर्वांत जास्त संसर्ग जेथे झाला, तेथील लोकांनी सर्व माहिती देणे गरजेचे आहे. त्यामुळे संसर्गाची ठिकाणे समजू शकतील आणि फैलाव थांबवण्यासाठी उपाय योजता येतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत निराशा हाती लागत आहे. (वृत्तसंस्था)>अनलॉकची प्रक्रिया सुरून्यूयॉर्कमध्ये आता अनलॉकची प्रक्रिया जोरात सुरू झाली आहे. अनलॉकच्या दुसºया टप्प्यात किमान ३ लाख लोक आपापल्या कार्यालयांत नोकरीसाठी जातील, अशी अपेक्षा असल्याचे न्यूयॉर्कच्या महापौरांनी सांगितले. न्यूयॉर्कमध्ये संसर्गाचे प्रमाण आता खूप कमी झाले आहे. शनिवारी शहरात संसर्गामुळे १५ नागरिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंतचा हा सर्वात कमी आकडा आहे, असे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या