शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जॅक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅंक आणि रिचर्ड हेंडरसन यांना रसायनशास्त्राचे नोबेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 15:37 IST

यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल जॅक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅंक आणि रिचर्ड हेंडरसन यांना देण्याचे आज जाहीर करण्यात आले आहे. ड्युबोशे, फ्रॅंक आणि हेंडरसन यांनी, पदार्थाच्या जैवरेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान नोबेल समिती करत असल्याचे जाहीर करण्यात आले.

स्टॉकहोम, दि.4- यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल जॅक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅंक आणि रिचर्ड हेंडरसन यांना देण्याचे आज जाहीर करण्यात आले आहे. जगातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची परवापासून घोषणा होत आहे. काल पदार्थविज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज रसायनशास्त्राचे नोबेल सन्मान जाहीर करण्यात आले. ड्युबोशे, फ्रॅंक आणि हेंडरसन यांनी, पदार्थाच्या जैवरेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान नोबेल समिती करत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांच्या संशोधनामुळे संशोधकांना जैवरेणू गोठवून अभ्यास करणे सोपे जाणार आहे.

1901 पासून आजवर रसायनशास्त्रासाठी 108 नोबेल पुरस्कार जाहीर झाले, यामध्ये 175 वैज्ञानिकांचा सन्मान करण्यात आलेला आहे. या पुरस्कारांची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्समध्ये करण्यात आली. नोबेल पुरस्कार ज्याच्या नावाने देण्यात येतो तो आल्फ्रेड नोबेल स्वतः रसायनशास्त्रज्ञच होता. डायनामाईटच्या शोधाचे त्याने 1867 साली पेटंट घेतले, त्यामुळे त्याची चांगली भरभराटही झाली. मात्र काही काळानंतरच त्याचे दुष्परिणाम व दुरुपयोग होण्याच्या घटना समोर येऊ लागल्या. आल्फ्रेडच्या भावासह अनेक लोकांचा एका कारखान्यात झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. अशा अनेक घटना त्याचे विचार बदलण्यासाठी कारणीभूत ठरल्या.