शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. डेनिस मुक्वेगे व नादिया मुराद यांना नोबेल शांतता पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 16:59 IST

युद्ध आणि सशस्त्र संघर्षादरम्यान होणाऱा लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी काम करणाऱ्या डेनिस मुकुवे आणि नादिया मुराद यांना सन 2018 साठीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.

स्टॉकहोम : युद्ध काळात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात लढणारे डॉ. डेनिस मुक्वेगे आणि इसिसने केलेले अपहरण व अत्याचार यांचा सामना करून त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर याच कारणांसाठी लढणा-या नादिया मुराद या दोघांना संयुक्तरीत्या यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.युद्ध व संघर्षाच्या काळात होणारे लैंगिक शोषण थाबावे, यासाठी या दोघांनी केलेल्या कार्याबद्दल त्याचा गौरव केला जात आहे. डॉ. डेनिस मुक्वेगे हे कांगोतील असून, नादिया मुराद या इराकमधील याझ्दी कुर्दिश वंशाच्या आहेत. सुमारे पाच वर्षांपूर्वी, त्या १९ वर्षांच्या असताना इसिसच्या अतिरेक्यांनी त्यांच्या गावावर हल्ला चढवून ६00 लोकांना ठार केले होते. त्यात नादिया यांचे नातेवाईकही होते. त्यानंतर अतिरेक्यांनी नादियासह ६५00 महिलांचे अपहरण केले.नादिया यांच्यासह या गुलाम बनवण्यात आलेल्या महिलांवर बलात्कार, मारहाण, सिगारेटचे चटके देणे आणि अनन्वित अत्याचार करण्यात आले. संधी मिळताच तेथून पळून आलेल्या नादिया यांनी सातत्याने महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविला आणि प्रयत्नही केले. त्या २५ वर्षांच्या आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा संघासमोर त्यांनी महिलांवर युद्ध व सशस्त्र संघर्षाच्या काळात होणा-या अत्याचाराचे चित्र उभे केले आणि त्याविरोधात उभे राहण्याचे आवाहनही केले.डॉ. डेनिस मुकेग्वे हे स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. दुस-या कांगो युद्धापासून आजपर्यंत तिथे होणा-या सामूहिक बलात्कारपीडित महिलांवर ते सातत्याने उपचार करीत आहेत. अशा महिलांच्या जखमा ब-या करण्यासाठी त्यांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत. महिलांवरील अत्याचार व बलात्कार यांना आळा घालण्यासाठी कांगो सरकार आणि अनेक देश दुर्लक्ष करीत असल्याचे प्रतिपादन त्यांनी संयुक्त राष्ट्रांत केले होते. त्यांच्या या कार्याला विरोध करणा-या काहींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता आणि त्यांच्या मुलीचेही अपहरण केले होते. त्यांनी कार्य थांबवावे, अशी अपहरणकर्त्यांची मागणी होती. पण त्याला ते बळी पडले नाहीत.यांचीही होती नामांकनेयंदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी ३१ जणांचे नामांकन होते. त्यात डोनाल्ड ट्रम्प, उत्तर कोरियाचे हुकूमशहाकिम जोंग उन, पोप फ्रान्सिस, दक्षिण कोरियाचे मून जे इन यांचा समावेश होता. तामिळनाडू भाजपाच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नामांकनासाठी प्रयत्न केले होते.

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारnewsबातम्या