इराणसोबत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या रणधुमाळीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेला महत्त्वाच्या क्षणी मित्रदेशांनीच साथ सोडली आहे. 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुज' या महत्त्वाच्या सागरी मार्गावर इराणचा मुकाबला करण्यासाठी ट्रम्प यांनी मित्रदेशांकडे युद्धनौकांची मागणी केली होती, मात्र बहुतांश देशांनी मदतीस स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी "आम्हाला कोणाचीच गरज नाही, आमचे सैन्य जगातील सर्वात सामर्थ्यवान आहे," अशा शब्दांत आपला राग व्यक्त केला आहे.
७ देशांना दिली होती हा, पण...
ट्रम्प यांनी जर्मनी, स्पेन, इटली यांसारख्या जवळपास ७ मित्र देशांशी संपर्क साधून त्यांना आपल्या युद्धनौका हॉर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये तैनात करण्याचे आवाहन केले होते. जेणेकरून तेथून होणारा तेल पुरवठा सुरक्षित राहू शकेल. मात्र, या सर्व देशांनी हात वर केले आहेत. ब्रिटनने तर युद्ध संपल्यानंतर मदत देण्याचे अजब आश्वासन दिले, जे ट्रम्प यांनी तात्काळ फेटाळून लावले. "युद्ध संपल्यावर मला तुमच्या एअरक्राफ्ट कॅरिअरची काय गरज?" असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
नाटो विरण्याची भीती?
या संकटकाळात मित्रदेशांनी दाखवलेल्या उदासीनतेमुळे ट्रम्प यांनी 'नाटो'वरही निशाणा साधला आहे. "मी वर्षानुवर्षे सांगतोय की जेव्हा वेळ येईल तेव्हा हे देश मदतीला येणार नाहीत. जर सहयोगी देश अशीच भूमिका घेणार असतील, तर नाटोचे भवितव्य खूप अंधकारमय आहे," अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे. बेंजामिन नेतन्याहू यांच्या विश्वासावर युद्धात उतरलेल्या ट्रम्प यांना आता इस्रायलशिवाय कोणाचीही ठोस साथ मिळताना दिसत नाहीये.
हॉर्मुजचा मार्ग बंद राहणार!
दुसरीकडे, इराणचे नवे सुप्रीम लीडर मुज्तबा खामेनेई यांनी आक्रमक पवित्रा घेत 'हॉर्मुजची सामुद्रधुनी' बंदच राहील, असे स्पष्ट केले आहे. जगातील २० टक्के तेलाची वाहतूक याच मार्गावरून होते. इराणने आतापर्यंत १५ हून अधिक जहाजांवर हल्ले केले असून, इंधनाचे दर प्रति बॅरल २०० डॉलरपर्यंत नेण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत इंधनाचा मोठा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑपरेशन एपिक फ्युरी अन् युद्धाचा भडका
या युद्धाची ठिणगी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पडली होती. अमेरिका आणि इस्रायलने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत इराणवर मोठा हल्ला केला होता, ज्यात अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून सुरू असलेले हे युद्ध आता संपूर्ण मध्यपूर्वेत पसरले असून, अमेरिका आता एकाकी पडताना दिसत आहे.
Web Summary : Amidst the Iran conflict, Trump faces isolation as allies decline military support in the Strait of Hormuz. Angered, Trump asserts U.S. self-reliance, questioning NATO's future. Iran threatens to close the Strait, escalating global oil concerns following a prior joint US-Israel attack.
Web Summary : ईरान संघर्ष के बीच, ट्रंप को अलगाव का सामना करना पड़ रहा है क्योंकि सहयोगियों ने होर्मुज जलडमरूमध्य में सैन्य समर्थन से इनकार कर दिया है। नाराज ट्रंप ने अमेरिकी आत्मनिर्भरता पर जोर दिया, नाटो के भविष्य पर सवाल उठाया। ईरान ने जलडमरूमध्य को बंद करने की धमकी दी, जिससे पहले अमेरिका-इजरायल के संयुक्त हमले के बाद वैश्विक तेल चिंताएं बढ़ गईं।