शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
4
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
5
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
6
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
7
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
8
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
9
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
10
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
11
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
12
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
13
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
14
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
15
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
16
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
17
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
18
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
19
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
20
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?

कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:34 IST

no free lunch pakistani media on donald trump and asim munir meeting महत्वाचे म्हणजे, इस्रायल-इराण युद्ध सुरू असतानाच त्यांना बोलावण्यात आले होते आणि आसिम मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये लन्च देण्याची किंमत वसूल केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

सध्या पाकिस्तानचे लष्करप्रमुख तथा फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीची माध्यमांत जबरदस्त चर्चा सुरू आहे. कारण, कुठल्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाला बोलांवून बोलायची ही पहिलीच वेळ आहे. सर्वसाधारणपणे, एखाद्या देशाचा राष्ट्रप्रमुख दुसऱ्या देशाच्या लष्कर प्रमुखासोबत अशा पद्धतीने भेट घेत नाही. कुठल्याही प्रकारच्या द्विपक्षीय चर्चेसाठी समकक्ष नेत्यांची चर्चा होत असते. यामुळे आसिम मुनीर आणि ट्रम्प यांच्या भेटीचे वेगवेगळे कयास बांधले जात आहेत.  महत्वाचे म्हणजे, इस्रायल-इराण युद्ध सुरू असतानाच त्यांना बोलावण्यात आले होते आणि आसिम मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये लन्च देण्याची किंमत वसूल केली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

या बैठकीसंदर्भात डॉनमधील एका लेखात, 'लन्च अथवा जेवण कुणीही फुकट देत नाही,' असे म्हटले आहे. बाकिर सज्जाद सय्यद यांनी आपल्या लेखात म्हटले आहे, "पाकिस्तानने इराणला पाठिंबा जाहीर केला, तेव्हा ही बैठक आयोजित केली गेली. पाकिस्तानचा वापर लाँचपॅड म्हणून करण्याचा धोका दिसत आहे. यावेळी सय्यद यांनी ट्रम्प यांच्या एका विधानाचाही उल्लेख केला. ज्यात, "असीम मुनीर इराणला खूप चांगले ओळखतात. ते इराणमध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल अजिबात खूश नाहीत. त्यांचे इस्रायलशी संबंध वाईट आहेत, असेही नाही." असे ट्रम्प यांनी म्हटले होते." याशिवाय, आपल्या बैठकीचा मुख्य अजेडा मध्य पूर्व होता, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते.

बाकिर सज्जाद पुढे लिहितात, पाकिस्तानसाठी, त्याची अस्पष्टता ढाल म्हणून काम करू शकते. इराणशी नैतिक ऐक्य दर्शवून, मात्र लष्करी वचनबद्धतेपासून दूर राहून इस्लामाबादला आशा आहे की, तो आपल्यासाठी एक जागा तयार करू शकेल. यामुळे तो अमेरिकेची नाराजी आणि इराणचा संशय दोन्हींपासूनही वाचेल. इराणची निंदा करणाऱ्या IAEA मतदानापासून दूर राहण्याचा त्याचा निर्णय तेच संतुलन सांदण्याचा संकेत आहे. मात्र, एक सत्य हेही आहे की, मोफत जेवण कुणीही देत नाही. विशेषतः ते जे व्हाइट हाऊसमध्ये दिले जाते.

या बैठकीसंदर्भात डॉन या वृत्तपत्रात चिंता व्यक्त करण्यात आली आहे की, संबंधित बैठकीसाठी पाकिस्तानकडून कुठलेही राजकीय नेतृत्व नव्हते. बाकिर सज्जाद पुढे लिहितात, लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, याबैठकीसाठी अमेरिकेकडून डोनाल्ड ट्रम्प, मार्को रुबियो आणि मध्य पूर्वेसाठीचे अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ उपस्थित होते. तर दुसरीकडे, पाकिस्तानकडून कोणतेही राजकीय नेतृत्व उपस्थित नव्हते. लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि आयएसआयचे महासंचालक असीम मलिक हे या बैठकीत सहभागी झाले होते. ही बैठक एक तासासाठी बोती. मात्र, दोन तास चालली. यावरून, स्पष्ट होते की, ही बैठक सामान्य नव्हती आणि अमेरिकेच्या काही रणनीतीचा भाग होती.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायल