शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधात्मक लस खरेदीसाठी पैसेच नाहीत, मोफत लसीच्या भरवशावर पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 13:08 IST

Coronavirus Vaccine : सध्या जगभरात अनेक ठिकाणी सुरू झालंय कोरोना प्रतिबंधात्मक लसीचं लसीकरण

ठळक मुद्देसध्या जगभरात अनेक ठिकाणी सुरू झालंय कोरोना प्रतिबंधात्मक लसीचं लसीकरणभारतानं अनेक देशांना पुरवली लस

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात झाली आहे. भारतातही या लसीकरणाला सुरूवात झाली असून भारतानं अनेक देशांना आतापर्यंत लसीचा पुरवठा केला आहे. परंतु पाकिस्ताननं भारताकडे लसींची मागणी केली नव्हती. चीननं काही लसी पाकिस्तानला मोफत दिल्या होत्या. परंतु आता मोठी बाब समोर आली आहे. पाकिस्तान आताही मोफत लस मिळण्याच्याच भरवशावर असून यावर्षी पाकिस्तान आपल्या देशातील नागरिकांसाठी लसींची खरेदी करणार नसल्याचं वृत्त एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीनं दिलं आहे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे सेक्रेटरी अमिर अशरफ ख्वाजा यांनी गुरूवारी पब्लिक अकाऊंट कमिटीच्या ब्रिफिंगदरम्यान ही माहिती दिली. "इमरान सरकार सध्या महासाथीचा सामना करण्यासाी हर्ड इम्युनिटी आणि आपल्या सहकारी देशांकडून मोफत मिळणाऱ्या लसीच्या पुरवठ्यावर अवलंबून असेल," असं ख्वाजा यांनी सांगितलं. कोरोना विषाणूच्या महासाथीपासून आपल्या देशातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणात लसींची खरेदी करत आहेत. परंतु या उलट पाकिस्तान लसींची खरेदी करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय डोनर्स आणि चीनसारख्या देशांवर लसीसाठी मोफत लसीसाठी अवलंबून आहे.मोफत लसींची वाट लोकलेखा समितीचे अध्यक्ष राणा तनवीर हुसैन यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या सेक्रेटरींना पाकिस्तान मोफत मिळणाऱ्या लसींची वाट पाहत आहे का असा सवाल केला. यावर उत्तर देताना त्यांनी पाकिस्तानला कोरोनाच्या अधिक लसी खरेदी करण्याची गरजच पडणार नसल्याचं उत्तर त्यांनी दिली. चीनद्वारे विकसित करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या एका डोसची किंमत १३ डॉलर्स इतकी असल्याची माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ एक्झिक्युटिव्हचे डायरेक्टर मेजर जनरल अमिर इकराम यांनी दिली. दरम्यान एनएचएसच्या सेक्रेटरींनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या सिनोफार्म या कंपनीनं पाकिस्तानला १० लाख डोस देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यापैकी पाच लाख डोस आतापर्यंत पुरवण्यात आले आहेत. त्यापैकी २ लाख ७५ हजार डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस