शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इराणची राजवट बदलण्याचा प्रयत्न नाही : ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:13 IST

इराणमध्ये राजवट बदलण्याच्या प्रयत्नात आम्ही नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी म्हटले.

टोकियो : इराणमध्ये राजवट बदलण्याच्या प्रयत्नात आम्ही नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी म्हटले. मध्य पूर्वेत अमेरिकेने सैन्य तैनात केल्यामुळे उभय देशांत तणाव वाढलेला असताना त्यांनी वरील विधान केले. यावेळी त्यांच्यासोबत जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे होते.ट्रम्प सध्या जपानच्या दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, ‘आम्ही इराणमध्ये राजवट बदलण्याच्या प्रयत्नात नाही हे मला स्पष्ट करू द्या. अण्वस्त्रे नसावीत हे आम्हाला हवे आहे. इराणला दुखावण्याचा माझा प्रयत्न नाही.’ इराणच्या धमक्यांना शह देण्यासाठी आम्ही मध्य पूर्वेत अतिरिक्त १५०० सैन्य तुकडी तैनात करीत आहोत, असे अमेरिकेने शुक्रवारी म्हटले होते. उभय देशांत लष्करी तणाव वाढत जात असताना तुकड्या तैनात होत आहेत. इराणसोबत गेल्या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय अणू करारातून अमेरिकेने माघार घेण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केल्यापासून व इराणवर पुन्हा निर्बंध लादल्यामुळे या दोन्ही देशांत तणाव वाढतो आहे. ‘इराणसोबतचा तो भयानक करार’ असल्याची आपली टीका ट्रम्प यांनी सोमवारी पुन्हा करताना मी पुन्हा नव्या वाटाघाटींसाठी तयार आहे. आम्ही करार करू, असे म्हटले. त्याआधी ट्रम्प म्हणाले होते की,‘ इराणला चर्चा करायला आवडेल असा मला विश्वास आहे आणि त्याची तशी तयारी असेल तर आम्हीही तयार आहोत.’ ट्रम्प यांनी जपानमध्ये महत्त्वाच्या विषयावरील चर्चेत उत्तर कोरियाबाबतही असाच सलोख्याचा सूर लावला आहे. उत्तर कोरिया हा फारच मोठा धोका असल्याची अमेरिकेची भूमिका आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन यांच्यासोबत ट्रम्प यांनी यापूर्वी दोन फेऱ्यांत चर्चा केली होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प