शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Punjab National Bank Scam: नीरव मोदीला भारतात यावेच लागणार; ब्रिटनच्या कोर्टात हरला खटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 06:55 IST

आरोपात तथ्य असल्यामुळेच नीरव मोदीला भारतातील न्यायालयात उभे राहावेच लागेल, असे ब्रिटनच्या न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे

लंडन : पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या साह्याने  तब्बल १३ हजार ६०० कोटी रुपयांचा घाेटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात पाठवले जाईल, हे नक्की झाले आहे.  ब्रिटनच्या न्यायालयामध्ये प्रत्यार्पण खटल्यात पराभव झाला आहे. त्याच्यावरील आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपात तथ्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

आरोपात तथ्य असल्यामुळेच नीरव मोदीला भारतातील न्यायालयात उभे राहावेच लागेल, असे ब्रिटनच्या न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. त्याने साक्षीदारांना धमकावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असेही न्यायालयाने म्हटले. खटल्याचा निकाल सुनावण्यात आला, तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नीरव माेदी उपस्थित होता. पण निकालानंतरही तो अतिशय निर्विकार होता. निकाल ऐकून त्याच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही.  जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गुझी यांनी निकालाचा काही भाग न्यायालयात वाचून दाखविला. ते म्हणाले की, आपण पूर्ण निकालपत्र गृहमंत्र्यांकडे (सेक्रेटरी ऑफ स्टेट) पाठवत आहोत. 

आर्थर रोड तुरुंगात

नीरव मोदी याच्यासाठी आर्थर रोड तुरुंगातील १२ क्रमांकाची बराक ही योग्य जागा आहे, तिथे त्याच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि आत्महत्या करण्यास तिथे वावही नसेल, असेही  न्यायालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा