शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वंशाच्या निक्की लढवणार अमेरिका अध्यक्षपदाची निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 11:46 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी महामुकाबला? नवीन पिढीला संधी देण्याची मागणी

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या निक्की हेली २०२४ मध्ये रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होऊ शकतात. निक्की यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत २०२४च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी औपचारिकपणे उमेदवारी जाहीर केली आहे. ५१ वर्षीय निक्की रंधावा हेली या रिपब्लिकन पक्षाच्या सदस्या असून त्या दक्षिण कॅरोलिना राज्याच्या राज्यपाल होत्या. निक्की म्हणाल्या की, मी निक्की हेली असून, अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरली आहे.

रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार होण्यापूर्वी निक्की यांना दोन टप्प्यातील निवडणूक जिंकावी लागणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच जाहीर केले आहे की, त्यांना २०२४ मध्ये उमेदवार व्हायचे आहे. आणखी काही लोक अध्यक्षपदाच्या शर्यतीत येऊ शकतात. मात्र, मुख्य लढत ट्रम्प आणि हेली यांच्यातच होणार असल्याचे मानले जात आहे. रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीच्या वेळापत्रकात दक्षिण कॅरोलिना तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

निक्की नेमके काय म्हणाल्या? हेली यांनी व्हिडीओमध्ये म्हटले की, हीच वेळ आहे, जेव्हा नवीन पिढीच्या नेतृत्वाला संधी मिळायला हवी. आपल्याला आपली अर्थव्यवस्था निश्चित करायची आहे, आपल्या सीमा सुरक्षित करायच्या आहेत आणि शेवटी हा देश पूर्वीपेक्षा मजबूत बनवायचा आहे. हेच आमचे ध्येय आणि अभिमान आहे.

आतापर्यंतची कामगिरीn यूएनमध्ये अमेरिकेच्या राजदूतn दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नरपदाची निवडणूक दोनदा जिंकलीn २०११ मध्ये पहिल्यांदा राज्यपाल झाल्या तेव्हा त्या ३९ वर्षांच्या होत्या.n दक्षिण कॅरोलिना राज्याची पहिली महिला गव्हर्नर होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.n अमेरिकेच्या सर्वात तरुण गव्हर्नर होत्या.

भारताशी नाते कसे? n निक्की यांचे वडील अजित सिंग रंधावा हे पंजाबमधील तरनतारणचे रहिवासी आहेत. अजित सिंह पंजाब कृषी विद्यापीठात प्राध्यापक तर आई राज रंधवा यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती. n १९६० च्या दशकात निक्की यांचे कुटुंब दक्षिण कॅरोलिनामध्ये राहू लागले. निम्रत म्हणजेच निक्कीने १९९६ मध्ये मायकल हेली नावाच्या अमेरिकन व्यक्तीशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत.

निक्की यांच्या आधी फक्त ट्रम्प यांनी २०२४ मध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. निक्की यांच्यामुळे ट्रम्प यांना आव्हान निर्माण झाले आहे. 

आणखी कोण स्पर्धेमध्ये? 

माजी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्सफ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसेंटिस लिझ चेनी आणि माईक पॉम्पीओ

 

टॅग्स :AmericaअमेरिकाElectionनिवडणूकPresidentराष्ट्राध्यक्ष