शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त झालेल्या देशात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, परदेशातून आलेले प्रवासी 'पॉझिटिव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 12:32 IST

मागील आठवड्यात न्यूझीलंड देशानं कोरोनामुक्त झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.

कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान माजवलं आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 81 लाख 18,671 इतकी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 39,198 जणांना प्राण गमवावे लागले, तर 42 लाख 16,325 रुग्ण बरे झाले आहेत. असे असताना मागील आठवड्यात न्यूझीलंड देशानं कोरोनामुक्त झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली. त्यामुळे जगभरातून न्यूझीलंड प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले गेले. पण, आता न्यूझीलंड कोरोनामुक्त राहिलेला नाही. परदेशातून आलेले दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे 24 दिवसांनंतर न्यूझीलंडमध्ये कोरोनाची दोन रुग्ण सापडली आहेत आणि त्यांच्या संपर्कात येऊन आणखी किती जणांना कोरोना झाला असेल, याचा तपास तातडीनं सुरू करण्यात आला आहे.

ब्रिटन येथून आलेले दोन प्रवासी कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील आठवड्यात न्यूझीलंडनं लॉकडाऊन उठवला होता. या संकटावर मात करणारा न्यूझीलंड हा पहिला देश ठरला होता. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन यांनी दोन रुग्ण सापडल्याची माहिती दिली. लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेले न्यूझीलंडचे रहिवाशी आता परतीच्या वाटेवर आहेत आणि त्यामुळे पुन्हा देशात कोरोनारुग्ण वाढण्याची भीतीही आर्डेन यांनी व्यक्त केली. दोन नवीन रुग्णांमध्ये  30 व 40 वर्षीय महिलांचा समावेश आहे. पालकांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या दोघी वेलिंग्टन येथे आल्या होत्या.

7 जूनला दोघी लंडन व्हाया दोहा आणि ब्रिस्बन वेलिंग्टन येथे दाखल झाल्या होत्या. या दोघींना आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे न्यूझीलंडमधील आता कोरोना रुग्णांची संख्या 1506 झाली असून त्यापैकी 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पालकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावण्यासाठी दोघींना परवानगी देण्यात आली होती. अंत्यसंस्काराच्या वेळी ते अनेकांना भेटले होते आणि त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध सुरू झाला आहे. 

Well Done; CSK साठी मोची काम करणाऱ्या भास्करन यांना इरफान पठाणची आर्थिक मदत!

मोठी अपडेट; IPL 2020चा मार्ग मोकळा, BCCI साठी गुड न्यूज?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNew Zealandन्यूझीलंड