शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्कमधील दहशतवादी हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 09:31 IST

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असलेल्या मॅनहॅटन शहरात मंगळवारी दुपारी एका ट्रक चालकाने पादचा-यांना चिरडले आणि एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यूयॉर्क - अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असलेल्या मॅनहॅटन शहरात मंगळवारी दुपारी एका ट्रक चालकाने पादचा-यांना चिरडले आणि एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 12 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनहटन शहरातील हडसन नदीच्या किना-यावर दुचाकी स्वारांसाठी रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्यावरील पादचा-यांना एका ट्रक चालकाने भरधाव वेगात चिरडले. या घटनेमुळे धावपळ उडाली असता येथील एका गाडीतून गोळीबार सुद्धा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून बारा जण जखमी झाले आहेत. दरम्यान,  घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून त्यांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच, पोलिसांनी त्याच्याकडील असलेला शस्त्रसाठा जप्त केला असून पुढील तपास सुरु केला आहे. याचबरोबर, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमधील हल्ला हा आजारी आणि माथेफिरू व्यक्तीकडून करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच, इसिस या दहशतवादी संघटनेला अमेरिकेत येऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय