शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

New York Brooklyn Station Firing : न्यूयॉर्कमधील मेट्रो स्थानकावर दहशतवादी हल्ला; पाच जणांवर गोळीबार, १३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:45 IST

New York Brooklyn subway shooting: पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या गोळीबारात 13 जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील मेट्रो स्थानकावर सकाळी साडेआठच्या सुमारास मोठा हल्ला झाला आहे. यामध्ये एका नारिंगी कपड्यांमध्ये आलेल्या व्यक्तीने प्रवाशांवर गोळीबार केला. यात पाच जणांना गोळ्या लागल्या असून १३ जण जखमी झाले आहेत. हल्लेखोर पळून गेल्याने सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

घटनास्थळावरून न फुटलेले स्फोटकही ताब्यात घेण्यात आले आहे. हा हल्लेखोर चेहऱ्यावर गॅस मास्क घालून आला होता. त्याने प्रवाशांना पाहताच गोळीबार सुरु केला. यामुळे एकच धावपळ उडाली. स्फोटकांचे आवाजही ऐकू आले. धुरही बाहेर दिसत होता. रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडले होते. हल्लेखोराने आधी धूर निर्माण केल्याने प्रवाशांना पळून जाता आले नाही. ऑरेंज कलरच्या पोषाखात असल्याने तो विकास कामांवरील कर्मचारी असल्याचे अनेकांना वाटले. परंतू त्याच्या वेशात हल्लेखोर होता. धूर निघू लागल्याने अग्निशमन दलाला बोलविण्यात आले, याचसोबत पोलिसांनाही खबर देण्यात आली. 

पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या गोळीबारात 13 जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येत असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा वाढवली असून संपूर्ण न्यूयॉर्क शहरात सबवे मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. लोकांना काही संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AmericaअमेरिकाTerror Attackदहशतवादी हल्ला