नवी दिल्ली : राजकारणात राजशिष्टाचाराला दिले जाणारे महत्त्व पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही औपचारिकता बाजूला सारत अचानक लाहोरला दिलेली भेट अनोखी ठरते. शुक्रवारी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा असलेला वाढदिवस पाहता या दोन देशांच्या संबंधांच्या दृष्टीने यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. भाकपनेही मोदींच्या अकस्मात भेटीचे स्वागत केले आहे. मोदींनी लाहोरला दिलेली आश्चर्यकारक भेट देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.युरोपियन युनियन आणि आशियन यासारख्या देशांमधील संबंधाप्रमाणे भारत-पाकिस्तान या दोन शेजारी मित्रांना आपल्या संबंधात अनौपचारिकता आणायची आहे, असे भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी म्हटले. वाजपेयींनी पक्षाच्या परराष्ट्र धोरणाला आकार देताना महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या वाढदिवशीच पाकिस्तानला मोदींनी राजशिष्टाचार बाजूला सारत दिलेली भेट ही महत्त्वपूर्ण ठरते, असे टिष्ट्वट त्यांनी केले. चर्चेची चर्चा : पुढील महिन्यात परराष्ट्र सचिवांची होणार भेटदोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी ६ डिसेंबरला बँकॉकमध्ये चर्चा केली होती. यानंतरही असेच आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. यानंतर काही दिवसातच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता आणि दोन्ही देशांनी चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही देशांच्या विदेश सचिवात पुढील महिन्यात इस्लामाबादेत चर्चा होण्याची शक्यता आहे. शरीफ यांच्या घरी मोदींचे शाही भोजन, शरिफांच्या आईचे घेतले आशीर्वाद मोदींसह शिष्टमंडळाचे ११ सदस्य जट्टी उमरा येथे गेले होते. त्यांच्यासाठी ७२ तासांचा व्हिसा जारी करण्यात आला होता. तर शिष्टमंडळातील अन्य १०० पेक्षा अधिक सदस्य अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरच थांबले होते. त्यांच्यासाठी विमानतळावरच चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. लाहोरच्या उपनगरात असलेल्या जट्टी उमरा येथे मोदी पोहोचले तेंव्हा शरीफ यांचे पुत्र हसन आणि अन्य कुटुंबियांनी मोदी यांचे जोरदार स्वागत केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेंव्हा या दोन नेत्यांची बैठक सुरु होती तेंव्हा शरीफ यांच्या आई अन्य कुटुंबियांसह तेथे आल्या. यावेळी मोदीयांनी शरीफ यांच्या आर्इंचे पाया पडून आशीर्वाद घेतले. टिष्ट्वटरवरही शुभेच्छा !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपणास दीर्घायुरारोग्य लाभो, असे मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.मोदी दाऊदला आणायला गेले काय? शिवसेनेची उपहासात्मक टीकापंतप्रधान नरेंद्र मोदी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातून आणण्यासाठी लाहोरला गेले काय? असा सवाल करीत रालोआतील घटक असलेल्या शिवसेनेने शरसंधान केले आहे.मोदी अचानक पाकिस्तान भेटीवर जाण्याचे कारण काय? ते दाऊदला घेऊन येणार काय? दाऊदचा शनिवारी वाढदिवस आहे. अनेकजण त्याला शुभेच्छा देण्यासाठी पाकिस्तानात पोहोचत आहेत. मोदी आणि शरीफ यांच्या भेटीनंतर दाऊदला भारताच्या हवाली केले जाणार काय, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी टिष्ट्वटरवर केला. जम्मू-काश्मीरमधील सरकारमध्ये मुख्य पक्ष असलेल्या पीडीपीने या दोन नेत्यांच्या भेटीचे स्वागत करतानाच चर्चा सकारात्मक होण्याची आशा व्यक्त केली आहे.धक्का बसला- जेडीयूभारतीय जवानाचा शिरच्छेद करण्यासह पाकिस्तान नियमांचे उल्लंघन करीत असताना मोदींनी लाहोरला अचानक भेट देण्याचा निर्णय धक्कादायकच असल्याचे जेडीयूने म्हटले. सध्या मला धक्का बसला आहे. हेमराजचा झालेल्या शिरच्छेदावर मी विचार करतो आहे, असे जेडीयूचे नेते के.सी. त्यागी यांनी स्पष्ट केले.मोदींची भेट स्वागतार्ह- भाकपभारत- पाकिस्तानची चर्चेची प्रक्रिया समोर नेण्याच्या दिशेने ही भेट मदत करणारी ठरू शकते. दोन देशांचे ताणले गेलेले संबंध पाहता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील(एनएसए) चर्चेने अखेर बर्फ वितळला आहे. काही अनुत्तरित प्रश्न...पंतप्रधानांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचा आंतरराष्ट्रीय दौरा इतक्या आकस्मिकपणे बदलू शकतो का ?सुरक्षेपासून राजशिष्टाचारापर्यंत अनेक उपचार पूर्ण करण्यासाठी इतका कमी कालावधी कसा पुरला?काबूलहून अचानक लाहोरला जाण्याचा निर्णय भारताचे सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्रालयाला ठाऊक होता का?या भेटीमुळे पंतप्रधान मोदींसोबत असलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या आणि स्वत: मोदींच्या जि२वाशी खेळ झाला काय?पाकिस्तानातील दररोजचा हिंसाचार आणि तेथील विमानतळांवरील दहशतवादी कृत्यांचा इतिहास या पार्श्वभूमीवर मोदींनी अचानक लाहोरला उतरणे योग्य होते काय?ज्या शेजारी राष्ट्राशी सरहद्दीवर कायम युद्धसदृश स्थितीचा सामना करावा लागतो, त्या देशाला अशी अनियोजित भेट देणे धोकादायक नव्हते काय?हे व असे अनेक प्रश्न मोदींच्या पाक भेटीनंतर सोशल मीडियावर उपस्थित होऊ लागले. चर्चेचा आणि काळजीचाही विषय बनले. काही वाचकांनी ‘लोकमत’कडे फोनद्वारे या प्रश्नांच्या अनुषंगाने चिंता व्यक्त केली.
शिष्टाचार झुगारून मोदींचे राजकारणाला नवे वळण
By admin | Updated: December 26, 2015 02:44 IST