शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:27 IST

नेपाळ प्रशासनाच्या या निर्णयामुळे तिथल्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारण तस्करी आणि अवैध कारवायांच्या तक्रारी बऱ्याच काळापासून येत होत्या.

नेपाळ प्रशासनाने भारत-नेपाळ सीमेवरील वाहतुकीवरील निर्बंध पुन्हा एकदा कडक केले आहेत. आता भारतीय नोंदणी क्रमांक असलेल्या दुचाकींना नेपाळमध्ये प्रवेश करताना प्रवेश परवाना घेणे बंधनकारक असेल. त्याशिवाय निश्चित कालावधीसाठी पासही जारी केला जाईल. या आधारावर केवळ मुख्यालय परिसरापर्यंतच फिरण्याची परवानगी दिली जाईल तर आत प्रवेश करताना सीमा शुल्क भरणे अनिवार्य असेल.

भारतीय वाहन चालकांना नेपाळमध्ये प्रवेश करताच एक पास दिला जाईल. त्यावर स्पष्टपणे वेळेचा उल्लेख असेल. मालंगवा येथे सीडीओ रामू राज कादरिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या महापौरांसोबत एक महत्त्वाची बैठक झाली. ज्यामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय दुचाकी प्रवेशाला आणि वाहतूक पास देण्यावर एकमत झाले.

काय आहे नवीन नियम?

नेपाळमध्ये आधीपासूनच एक तरतूद होती, ज्यानुसार भारतीय वाहनांना प्रवेशावेळी नोंदणी करणे आणि ठराविक वेळेत परत जाणे आवश्यक होते. प्रवासाला फक्त मुख्यालय क्षेत्रापर्यंतच परवानगी होती तर पुढील कोणत्याही प्रवासासाठी सीमाशुल्क मंजुरी आवश्यक होती. पूर्वी हा नियम केवळ सामान्य लोकांसाठी मर्यादित होता आणि प्रभावशाली लोक व समाजकंटक अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करत असत. मात्र आता नेपाळमधील बालेंद्र सरकारच्या कठोर भूमिकेमुळे या नियमाची कडक अंमलबजावणी केली जात आहे. भारतीय वाहने नेपाळमध्ये प्रवेश करताच त्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतर वाहनचालकांना पास दिला जाईल. त्यांना मुख्यालयापर्यंत फिरण्याची परवानगी असेल. नियम मोडणाऱ्या भारतीय वाहनांविरोधात कारवाई केली जाईल.

दरम्यान, नेपाळ प्रशासनाच्या या निर्णयामुळे तिथल्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारण तस्करी आणि अवैध कारवायांच्या तक्रारी बऱ्याच काळापासून येत होत्या. या कठोर पावलामुळे अशा घटकांना आळा बसेल अशी लोकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु जास्त कर आणि महागडी वाहने टाळण्यासाठी भारतीय नातेवाईकांच्या नावावर किंवा दुहेरी नागरिकत्वाच्या आधारावर भारतीय वाहने नेपाळमध्ये उघडपणे ठेवली जात आहेत आणि चालवली जात आहेत ही सर्वात मोठी समस्या आहे. ही भारतीय वाहने गुन्हेगारीचे स्रोतही ठरली आहेत. इतकेच नाही तर माफिया गुन्हेगार भारतीय हद्दीतून चोरलेली वाहने सहजपणे नेपाळमध्ये आणू शकतात. 

भारतीयांमध्ये संताप

या नियमामुळे काही भारतीय नागरिकांमध्ये नाराजीही निर्माण झाली आहे. भारतीय वाहनांवर अधिक कठोर निर्बंध लादले जात आहेत तर नेपाळी वाहने भारतात मुक्तपणे फिरत आहेत. नेपाळी वाहनांच्या भारतातील प्रवेशासाठीही असेच नियम लागू करावेत अशी मागणी स्थानिकांमध्येही होत आहे. सीमावर्ती भागापर्यंत वाहतुकीला परवानगी द्यावी परंतु प्रवेशावेळी कर किंवा प्रवेश शुल्क अनिवार्य करावे असं भारतीयांचे म्हणणं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nepal tightens rules for Indian vehicles, sparks local anger.

Web Summary : Nepal's new rules mandate permits for Indian vehicles, limiting movement and requiring customs fees. Locals support the move citing illegal activities, while some Indians express resentment, demanding reciprocal rules for Nepali vehicles in India.
टॅग्स :NepalनेपाळIndiaभारत