शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प काढणार प्रवेशबंदीचा नवा आदेश!

By admin | Updated: February 12, 2017 00:25 IST

सात मुस्लीम बहुसंख्यांक देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यासाठी पुढील आठवड्यात नवे कार्यकारी आदेश काढण्याचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मनसुबा

वॉशिंग्टन : सात मुस्लीम बहुसंख्यांक देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्यासाठी पुढील आठवड्यात नवे कार्यकारी आदेश काढण्याचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मनसुबा आहे. आधीच्या अशाच निर्णयाला अमेरिकी न्यायालयाने स्थगिती दिली असून ती उठविण्यासही नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नवे आदेश काढण्याचा निर्णय घेतला. आम्ही ही लढाई जिंकू. दुर्देवी बाब ही आहे की, घटनात्मकद्दृष्ट्या याला वेळ लागेल; परंतु ही लढाई आम्ही निश्चितपणे जिंकू. आमच्याकडे इतरही अनेक पर्याय असून एकदम नवा कार्यकारी आदेश आणण्याचाही त्यात समावेश आहे, असे ट्रम्प म्हणाले. अ‍ॅण्ड्र्यूज हवाई दल तळावरून फ्लोरिडाला जाताना एअर फोर्स वन विमानात ते पत्रकारांशी बोलत होते. नवा कार्यकारी आदेश आणण्याचा तुमचा विचार आहे का, असा प्रश्न विचारला असताना ट्रम्प म्हणाले की, होय. असे होऊ शकते. सुरक्षेसाठी आम्हाला तत्परतेने निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे असे होऊ शकते. आपण नाईन्थ यूएस सर्किट कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या आदराखातर कोणत्याही निर्णयाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी एक आठवडा प्रतीक्षा करू. कदाचित सोमवार किंवा मंगळवारी नवे कार्यकारी आदेश काढले जातील. स्थलांतरशी संबंधित नव्या कार्यकारी आदेशात सुरक्षा उपाय अंतर्भूत असतील, असे ट्रम्प म्हणाले. आमच्याकडे अत्यंत कडक तपासणी होते. मी याला सखोल चौकशी म्हणतो. आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत भक्कम होणार आहोत. चांगल्या कामासाठी येऊ इच्छिणाऱ्या लोकांनाच आमच्या देशात प्रवेश असेल. नाईन्थ यूएस सर्किट कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने सात मुस्लीमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयावरील स्थगिती उठविण्यास गुरुवारी नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही भूमिका मांडली. सात प्रमुख मुस्लीम देशांचे लोक अमेरिकेचा दौरा करू शकतात, असा या निकालाचा अर्थ आहे. व्हाईट हाऊसमध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी काही गोष्टी अत्यंत तत्परतेने करणार आहोत. तुम्हाला हे पुढील आठवड्यात दिसेलच. याशिवाय आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करण्यात कसूर करणार नाही. अखेरीस आमचाच विजय होईल यात थोडीही शंका नाही. आम्ही आमचा देश सुरक्षित ठेवणार आहोत. त्यासाठी आम्ही आवश्यक ते सर्व उपाय करू. मी देशाला सर्वोत्कृष्ठ सुरक्षा पुरवेन, असे मतदारांना वाटले. (वृत्तसंस्था)खूप काही आत्मसात केलेन्यायालयाने दणका दिल्यानंतरही आपण अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत, असे संकेत ट्रम्प यांनी दिले. मी अलीकडेच राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. परंतु, मी खूप आत्मसात केले आहे. या त्या गोष्टी आहेत ज्या राष्ट्राध्यक्षपदावर असतानाच शिकता येऊ शकतात. देशावर मोठी संकटे घोंगावत आहेत, असे ट्रम्प म्हणाले.