शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

CoronaVirus: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर?; ३९ जणांना बाधा झाल्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 14:06 IST

CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली

वुहान: जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून रुग्ण आणि मृतांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं युरोपियन देशांमध्ये हजारोंचा बळी घेतल्यानंतर अमेरिकेत थैमान घातलं आहे. कोरोना युरोप आणि अमेरिकेत कित्येकांसाठी जीवघेणा ठरत असताना चीनमधील परिस्थिती सुधारली. चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता पुन्हा चीनमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळू शकतो. काल चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळून आले. हे सगळे जण परदेशांमधून चीनला परतल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलंय.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व संबंधित यंत्रणा अलर्टवर असल्याची माहिती चीनमधील अधिकाऱ्यानं दिली. परदेशात गेलेले चिनी नागरिक मायदेशी परतत आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं आज दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे एकूण ३९ रुग्ण आढळले असून यातील ३८ जण परदेशातून आलेले आहेत. तर एक व्यक्ती स्थानिक आहे. गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. यानंतर तिथे कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मार्चच्या अखेरपर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे ३ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र यानंतर हळूहळू चीनमधील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला. याचवेळी संपूर्ण जगभरात कोरोना अतिशय वेगानं पसरत होता. आत्ताही जगातील कित्येक देशांसमोर कोरोनानं मोठं आव्हान उभं केलंय. चीनमधून पुन्हा एकदा कोरोना थैमान घालू शकतो अशी भीती चीनच्या अधिकाऱ्यांना वाटू लागली आहे. जगभरात अडकलेल्या चिनी नागरिकांना मायदेशी आणण्याचं चीननं सुरू केलं आहे. परदेशातून चीनमध्ये परतणाऱ्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं वैद्यकीय अहवालांमधून समोर आलं आहे. त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन