Netherlands PM : नेदरलँड्सच्या राजकारणासाठी ऐतिहासिक क्षण आला आहे. डच सेंट्रिस्ट पार्टी D66 चे 38 वर्षीय नेते रॉब जेटन (Rob Jetten) देशाचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक (gay) पंतप्रधान बनणार आहेत. 29 ऑक्टोबर 2025 ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. जेटन यांनी अँटी-इस्लाम पॉप्युलिस्ट गीर्ट वाइल्डर्स (Geert Wilders) यांचा निवडणुकीत पराभव केला.
पक्षाला दोन वर्षांत शिखरावर पोचवले
रॉब जेटन यांनी फक्त दोन वर्षांत आपल्या पक्षाला सर्वात खालून डच राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. त्यांनी माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची प्रसिद्ध घोषणा “Yes, we can” ची प्रेरणा घेत “Het kan wel” (म्हणजेच हे शक्य आहे) हा सकारात्मक नारा दिला. जेटन यांच्या नेतृत्वाखाली D66 ने विभाजनाऐवजी एकतेचा, नकारात्मकतेऐवजी सकारात्मकतेचा संदेश देणारा प्रचार केला.
या विजयाबद्दल जेटन म्हणाले, आम्ही एक अत्यंत सकारात्मक प्रचार मोहीम चालवली, कारण गेल्या काही वर्षांपासून नेदरलँड्समध्ये पसरलेल्या नकारात्मकतेला आम्ही थांबवू इच्छित होतो. मी नेदरलँड्सला पुन्हा युरोपच्या केंद्रस्थानी आणू इच्छितो, कारण युरोपीय सहकार्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.
वाइल्डर्सच्या अतिरेकी धोरणांचा पराभव
या निवडणुकीत गीर्ट वाइल्डर्स यांनी आव्रजनविरोधी (anti-immigration) धोरणांवर भर दिला होता आणि कुराणवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र, जनतेने विभाजन नव्हे तर विकास आणि सहकार्याचा मार्ग निवडला. दरम्यान, परदेशात राहणाऱ्या डच नागरिकांची मते मोजल्यानंतर, निवडणुकीचे अधिकृत निकाल 3 नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. मात्र, आतापर्यंत हाती आलेल्या निकालात जेटन यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
कोण आहेत रॉब जेटन?
रॉब जेटन यांचा जन्म 25 मार्च 1987 रोजी नेदरलँड्सच्या दक्षिण प्रांत ब्राबांट मधील एका छोट्या शहरात झाला. त्यांनी कमी वयातच आपली समलैंगिक ओळख उघडपणे स्वीकारली. ते रॅडबाउड विद्यापीठ येथून लोक प्रशासनात पदवी आणि पदव्युत्तर पदवीधर आहेत. तरुण वयातच ते राजकारणात सक्रिय झाले आणि 2017 मध्ये D66 चे सर्वात तरुण खासदार म्हणून संसदेत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान मार्क रुट्टे यांच्या सरकारमध्ये जलवायू मंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केली.
खासगी जीवनातही खुलेपणा
जेटन यांचे वैयक्तिक जीवनही पारदर्शक आहे. ते आपल्या साथीदार निको कीनन (Nico Keenan) (अर्जेंटिनियन ऑलिंपियन हॉकी खेळाडू) सोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी 26 नोव्हेंबर 2024 रोजी इंस्टाग्रामवर आपल्या साखरपुड्याची घोषणा केली होती. अशारीतिने नेदरलँड्सला सर्वात तरुण आणि पहिले समलैंगित पंतप्रधान मिळणार आहेत.
Web Summary : Rob Jetten, 38, of the D66 party, is set to become Netherlands' youngest and first gay PM after winning the election against Geert Wilders. Jetten's campaign focused on unity and positivity, echoing Obama's message with 'Het kan wel' (Yes, we can). He is openly in a relationship with Nico Keenan.
Web Summary : डी66 पार्टी के 38 वर्षीय रॉब जेटन, गीर्ट वाइल्डर्स के खिलाफ चुनाव जीतने के बाद नीदरलैंड्स के सबसे युवा और पहले समलैंगिक पीएम बनने के लिए तैयार हैं। जेटन का अभियान एकता और सकारात्मकता पर केंद्रित था, जिसने ओबामा के संदेश को 'हेट कान वेल' (हाँ, हम कर सकते हैं) के साथ दोहराया। वह खुले तौर पर निको कीनन के साथ संबंध में हैं।