शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान जेव्हा कॉफी सांडलेली लादी स्वत:च स्वच्छ करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 06:15 IST

नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रूट पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आले आहेत. संसदेतून बाहेर जात असताना मार्क रूट यांच्या हातातील कॉफीचा कप खाली पडला आणि कॉफी लादीवर सांडली. यावेळी त्यांनी लगेच कॉफीचा कप उचलला आणि स्वत: लादी  साफ केली.

नेदरलँड :  नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रूट पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आले आहेत. संसदेतून बाहेर जात असताना मार्क रूट यांच्या हातातील कॉफीचा कप खाली पडला आणि कॉफी लादीवर सांडली. यावेळी त्यांनी लगेच कॉफीचा कप उचलला आणि स्वत: लादी  साफ केली. त्यांच्या या कामाचे सोशल मीडियात कौतुक करण्यात येत आहे. मार्क रूट यांचा सफाई करतानाचा हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मार्क रूट संसदेतील कामकाज आटपून बाहेर जाताना कॉफी पीत जात होते. यावेळी त्यांच्या हातून कॉफीचा कप खाली पडला आणि कॉफी लादीवर सांडली. सांडलेली कॉपी साफ करण्यासाठी येथील महिला कर्मचारी पुढे सरसावली. मात्र, मार्क रूट यांनी कॉफीचा कप उचलला आणि त्या महिलेकडून लादी पुसण्याचे साहित्य घेऊन स्वत: साफसफाई केली. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी त्यांच्या कामाचे टाळ्या वाजवून कौतुक केले.   दरम्यान, सोशल मीडियात सुद्धा त्यांच्या या कामाची प्रशंसा करण्यात येत आहे. पाकिस्तानचे पत्रकार हामिद मीर यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कधीतरी पंतप्रधान सफाई कर्मचा-याचे काम करु शकतात. मात्र आपल्याकडे असे होत नाही. फक्त नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्ट रूट हेच सफाई कर्मचारी म्हणून काम करु शकतात. म्हणूनच डच लोकांमध्ये ते लोकप्रिय आहेत. मी त्यांच्या नम्रपणाचा साक्षीदार आहे.  

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मार्क रूट नेदरलँडच्या राजाला भेटायला जातानाचा फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये ते चक्क सायकलवरून प्रवास करताना दिसले. व्यवस्थित सुटबूट परिधान केलेले मार्क रूट राजवाड्याजवळ आल्यानंतर त्यांनी आपली सायकल पार्क केली होती. त्यावेळी मार्क रूट नेदरलँडच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार होते. त्यानिमित्ताने त्यांनी राजाची भेट घेतली होती. याशिवाय गेल्यावर्षी जून महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड दौऱ्यावर होते. तेव्हा मार्क रूट यांनी नरेंद्र मोदींना सायकल भेट दिली होती. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधान