नेपाळमध्ये ओली सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे.हे आंदोलन आधी सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झाले होते. आता निदर्शनाने हिंसक वळण घेतले आहे. निदर्शकांनी मंत्र्यांवर हल्ले केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काठमांडूमध्ये निदर्शकांनी नेपाळचे अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली आहे. नेपाळमधून येणाऱ्या व्हिडिओमध्ये, काठमांडूच्या एका रस्त्यावर अर्थमंत्री बिष्णू प्रसाद दिसत आहेत. येथे, निदर्शकांनी एका रस्त्यावर अर्थमंत्री बिष्णू प्रसाद यांना घेरले आहे. त्यानंतर, निदर्शक त्यांचा पाठलाग करू करत असल्याचे दिसत आहे. तसेच त्यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. बिष्णू प्रसाद हे नेपाळचे उपपंतप्रधान आहेत.
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी देशाचे लष्करप्रमुख अशोक सिंघल यांच्याशी चर्चा केल्यानंतर राजीनामा दिला आहे. लष्करप्रमुख अशोक सिंघल यांनी केपी शर्मा ओली यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. यानंतर ओली यांना त्यांचे पद सोडण्यास भाग पाडण्यात आले.
संसद भवनाला लावली आग
निदर्शकांनी संसद भवनाला आग लावली. निदर्शक संसद भवनात घुसले होते, त्यांनी तोडफोड आणि जाळपोळ केली. संसद भवनात मोठी आग लागली आहे. संसद भवनातून धुराचे मोठे लोट बाहेर पडत आहेत. निदर्शकांनी अनेक मंत्र्यांच्या घरांनाही आग लावली आहे.
सध्या नेपाळमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर, नेपाळी सैन्य आता मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानांमध्ये सुरक्षा पुरवली आहे. सैन्य हेलिकॉप्टरद्वारे मंत्र्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहे. प्रत्यक्षात, देशभरात अनेक ठिकाणी निदर्शकांनी जाळपोळ केली आहे.