शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Nepal Plane Crash: ‘त्या’ विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला; ३५ जणांच्या मृतदेहाची ओळख पटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 13:12 IST

विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर), फ्लाइट डाटा रेकॉर्डर (एफडीआर) यांच्या तपासणीनंतर या अपघातामागचे नेमके कारण कळू शकेल. चार बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू 

काठमांडू : पाच भारतीयांसह ७२ प्रवासी असलेले नेपाळचे विमान रविवारी कोसळून ६८ जण ठार झाले होते. त्यातील ३५ जणांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या विमानाचा ब्लॅक बाॅक्स सापडला आहे. अपघातग्रस्त विमानातील चारजण अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. या विमान दुर्घटनेमुळे नेपाळमध्ये सोमवारी राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. 

विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर), फ्लाइट डाटा रेकॉर्डर (एफडीआर) यांच्या तपासणीनंतर या अपघातामागचे नेमके कारण कळू शकेल. यती एअरलाइन्सच्या विमान दुर्घटनेत दगावलेल्यांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या अपघाताची चौकशी करण्यासाठी नेपाळ सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ती आपला अहवाल ४५ दिवसांच्या आत सादर करणार आहे.

बसऐवजी ‘ते’ चौघे विमानात बसले!सोनू जयस्वाल, विशाल शर्मा, अनिल राजभर आणि अभिषेक कुशवाह हे चार मित्र उत्तर प्रदेशातील गाझीपूरचे रहिवासी होते. हे चौघेही पर्यटनस्थळ पोखरासाठी निघाले होते. 

पशुपतीनाथाचे दर्शन घेतल्यानंतर चौघांनीही दिलीप वर्मा या आपल्या मित्राला व्हिडीओ कॉल केला होता. पोखराला बसने जाणार आहोत, असेही त्यांनी दिलीपला सांगितले होते. “परंतु नंतर त्यांनी योजना बदलली आणि बसऐवजी विमानातून उड्डाण घेतले,” असे दिलीप वर्मा म्हणाले. अपघाताच्या काही क्षण आधी फेसबुक लाईव्ह करणारा सोनू जयस्वाल वाईन शॉप चालवत होता, असेही त्यांनी सांगितले. सोनूच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेनंतर दिलीप यांना जबर धक्का बसला आहे.

...म्हणून शेकडो जण वाचलेयती एअरलाइन्सचे विमान रविवारी पोखरा येथील जुन्या व नव्या विमानतळाच्या दरम्यान सेती नदीच्या काठावर दरीत कोसळले होते. त्यावेळी बॉम्बस्फोटासारखा भयंकर मोठा आवाज झाला व त्यानंतर आसमंतात धूर पसरला, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. हे विमान घरांवर कोसळले असते, तर आणखी मोठी जीवितहानी झाली असती. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. विमान कोसळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली होती. त्यानंतर काही वेळाने बचावपथकेही घटनास्थळी पोहोचली. ‘ते’ विमान पूर्वी होते 

किंगफिशर एअरलाइन्सचे नेपाळमध्ये कोसळलेले यती एअरलाइन्सचे विमान पूर्वी किंगफिशर एअरलाइन्सच्या मालकीचे होते, असे सिरियम फ्लिट्स डाटामधील नोंदीतून स्पष्ट झाले आहे. आर्थिक घोटाळ्यातील फरारी आरोपी व उद्योजक विजय मल्ल्या हा किंगफिशर एअरलाइन्सचा मालक होता. 

टॅग्स :Nepalनेपाळ