शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये पुन्हा राजकीय संकट, ओलींच्या पार्टीने काढला प्रचंड सरकारचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 22:29 IST

आता प्रचंड सरकारला संसदेत फ्लोर टेस्ट द्यावी लागेल आणि महिनाभरात बहुमत सिद्ध करावे लागेल, असे दिसून येत आहे. 

काठमांडू : नेपाळमधील (Nepal) सध्याचे प्रचंड सरकार अडचणीत आले आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेले युती सरकार अडचणीत आले असून, केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएलने सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली आहे. आता प्रचंड सरकारला संसदेत फ्लोर टेस्ट द्यावी लागेल आणि महिनाभरात बहुमत सिद्ध करावे लागेल, असे दिसून येत आहे. 

आम्ही सरकारच्या युतीचा पाठिंबा काढून घेतला असून सीपीएनचे (यूएमएल) सर्व मंत्री राजीनामा देणार आहेत. याबाबत सोमवारी बैठक झाली, त्यात पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सीपीएन-यूएमएलचे उपाध्यक्ष बिष्णू पौडेल यांनी सांगितले.  याचबरोबर, सर्व मतभेद असूनही नेपाळमधील राजकीय स्थैर्यासाठी आम्ही सरकार वाचवण्यासाठी आणि टिकवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पंतप्रधानांनी युती सरकारच्या मार्गावरून वेगळे जाण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यामुळेच आम्ही पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सीपीएन-यूएमएलचे उपाध्यक्ष बिष्णू पौडेल यांनी सांगितले. 

परराष्ट्रमंत्र्यांचा स्वित्झर्लंडचादौरा थांबवावा आणि त्यांना पदावरून बडतर्फ करावे, असे सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्री बिमला राय पौड्याल या यूएमएलच्या आहेत आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या उच्च-स्तरीय सत्रात सहभागी होण्यासाठी त्यांना जिनिव्हाला जायचे होते, परंतु त्यांना दौरा रद्द करावा लागला. त्यांच्या जागी नेपाळच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व आता उपपंतप्रधान नारायण काझी करणार आहेत.

नेपाळमध्ये 26 मार्चपर्यंत पुन्हा फ्लोर टेस्टराष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीनेही नेपाळ सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. शनिवारी ही घोषणा करण्यात आली होती. आता राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे की 26 मार्चपर्यंत पंतप्रधान पुष्प कमल दहल ऊर्फ 'प्रचंड' यांना पुन्हा फ्लोर टेस्टला सामोरे जावे लागेल. कलम 100 च्या खंड 2 नुसार, नेपाळच्या राज्यघटनेत तरतूद अशी आहे की, युती तुटल्यास किंवा सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास पंतप्रधानांना 30 दिवसांच्या आत विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यावे लागेल. दरम्यान, याआधी 10 जानेवारीला पुष्प कमल दहल यांना फ्लोर टेस्टचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांना 99 टक्के मते मिळाली. नेपाळच्या संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही पंतप्रधानाला एवढा पाठिंबा मिळाला होता. 

टॅग्स :Nepalनेपाळ