Nepal Crisis : मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदी विरोधात निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांने हिंसक वळण घेतले आहे, मंत्र्यांची घर जाळण्यात आली असून संसदही जाळले आहे. आता तुरुंगातून कैदीही पळून जात आहेत. दरम्यान, आता लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांनी राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी लोकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. यासोबतच, त्यांनी निदर्शकांना शेवटचा इशाराही दिला. यामध्ये त्यांनी 'जर रात्री १० वाजल्यानंतर काही हिंसाचार झाला तर कोणतीही दया दाखवली जाणार नाही' असे सांगितले. सध्या नेपाळचे प्रशासन लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे.
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
लष्करप्रमुख सिग्देल यांनी ज्यावेळी राष्ट्राला संबोधित केले त्यावेळी त्यांच्या मागे नेपाळचा राष्ट्रध्वज आणि एक फोटो दिसत होता. या फोटोने नेपाळ आणि इतर ठिकाणच्या लोकांचे लक्ष वेधले आहे. सिग्देल यांनी तो फोटो का लावला आणि तो कोणाचा आहे? अशा चर्चा सुरू झाल्या. याशिवाय, लोकांच्या मनात हा प्रश्नही आला की त्या फोटोद्वारे लष्करप्रमुखांनी संपूर्ण जगाला कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे?
सोशल मीडियावर चर्चा
हा फोटो १८ व्या शतकाच्या मध्यातील एका हिंदू राजाचे आहे, त्यांचे नाव पृथ्वी नारायण शाह होते. या राजाने प्रादेशिक एकात्मतेसाठी मोहीम राबवून आधुनिक नेपाळचा पाया रचला. हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू झाली आहे. या फोटोमध्ये काही विशेष संदेश लपलेला होता का किंवा त्याचे काही विशेष महत्त्व होते का? अशा चर्चा सुरू आहेत. जनरल सिग्देल यांच्या मागे पृथ्वी नारायण शाह यांच्या फोटो असणे एक मोठी कामगिरी म्हणत आहेत, तर काहीजण याला सर्वात मोठे चिन्ह असल्याचे बोलत आहेत.
१७ वर्षांत १३ सरकारे
नेपाळ, त्याच्या आधुनिक इतिहासातील बहुतेक काळ शाह राजवंशाच्या राजेशाहीखाली राज्य करत आला आहे. २००८ मध्ये, माओवादी बंडामुळे शाह राजघराण्याचे तत्कालीन प्रमुख राजा ज्ञानेंद्र शाह यांना सिंहासनावरून पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून, म्हणजेच आजपर्यंत, नेपाळमध्ये एकूण १३ सरकारे स्थापन झाली आणि पडली. राजकीय अस्थिरतेमुळे, या वर्षाच्या सुरुवातीला नेपाळमध्ये राजेशाही व्यवस्था पुन्हा स्थापित करण्यासाठी निदर्शने झाली. नेपाळच्या सध्याच्या लोकशाही व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीमुळे निराशेच्या पार्श्वभूमीवर, राजेशाही परत आणण्याबाबत चर्चा सुरू आहेत.