शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:52 IST

Nepal Crisis : २०२० मध्ये केपी शर्मा ओली नेपाळचे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांनी भगवान राम हे भारतीय नसून नेपाळी होते असे वादग्रस्त विधान केले होते.

Nepal Crisis : मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदी विरोधात निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांने हिंसक वळण घेतले आहे, मंत्र्यांची घर जाळण्यात आली असून संसदही जाळली आहे. आता तुरुंगातून कैदीही पळून जात आहेत. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ओली यांनी पहिले विधान केले. त्यांनी भारताविरोधात केलेल्या विधानामुळे सत्ता सोडावी असा दावा त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केपी शर्मा ओली यांनी त्यांच्याच पक्षाच्या सरचिटणीसांना एक पत्र पाठवले, या पत्रात त्यांनी भारताविरुद्ध विधान केले. ओली म्हणाले की, जर त्यांनी लिपुलेखवर प्रश्न उपस्थित केले नसते तर ते पदावर राहिले असते. ओली म्हणाले की, मी संवेदनशील मुद्द्यांवर भारताला आव्हान देण्याचे धाडस दाखवले आहे आणि हे त्याचेच परिणाम आहेत.

खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story

ओली यांनी अयोध्येचा उल्लेख केला

ओली यांनी अयोध्या आणि भगवान राम यांच्यावरील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना राजकीय किंमत मोजावी लागली असे म्हटले आहे. 'अयोध्येत राम जन्माला विरोध केल्यामुळे मी माझी सत्ता गमावली, असंही ओली म्हणाले. ते सध्या नेपाळी सैन्याच्या संरक्षणाखाली शिवपुरी बॅरेकमध्ये राहत आहेत.

२०२० मधील विधान काय?

२०२० मध्ये केपी शर्मा ओली नेपाळचे पंतप्रधान होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले होते.  'भगवान राम हे भारतीय नव्हते तर नेपाळी होते', असं विधान त्यांनी केले होते.  भगवान रामाचे राज्य अयोध्या नेपाळमधील बीरगंजच्या पश्चिमेस आहे, असंही ते म्हणाले होते.

केपी शर्मा ओली हे देखील लिपुलेख हा नेपाळचा असल्याचा दावा करत आहेत. लिपुलेख खिंड वाद हा भारत आणि नेपाळमधील सीमा वादांपैकी एक आहे. हा खिंड कालापानीभोवती फिरतो आणि काली नदीच्या उगमस्थानावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. नेपाळ म्हणत आहे की ही नदी लिपुलेखच्या वायव्येकडील लिपियाधुरा येथून उगम पावते, यामुळे कलापाणी आणि लिपुलेख त्यांच्या भूभागाचा भाग आहेत. याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे.  ही नदी कलापाणी गावाजवळून सुरू होते, यामुळे हा भाग उत्तराखंडचा भाग असल्याचे भारताने सांगितले आहे.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारत