काठमांडू : नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी पहाटे एक भीषण रस्ता अपघात झाला. पोखराहून काठमांडूकडे जाणारी एक प्रवासी बस हायवेवरून थेट त्रिशूली नदीत कोसळली. या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे १:३० च्या सुमारास धादिंग जिल्ह्यातील बेनिघाट रोरांग ग्रामीण नगरपालिकेच्या भैसिंगौडा भागात ही दुर्घटना घडली. बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस संरक्षक कठडे तोडून नदीत कोसळली. अपघात झाला तेव्हा बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते.
मृतांमध्ये परदेशी नागरिकांचा समावेशनेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये १२ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये एका परदेशी पुरुष आणि एका महिलेचाही समावेश आहे, मात्र त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
बचाव कार्यात अडचणीअपघात रात्रीच्या वेळी झाल्यामुळे आणि भाग दुर्गम असल्याने बचाव कार्यात सुरुवातीला अनेक अडथळे आले. स्थानिक नागरिक आणि सशस्त्र पोलीस दलाने संयुक्तपणे बचाव मोहीम राबवून नदीत पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी काठमांडू येथे हलवण्यात आले आहे.
Web Summary : A bus plunged into the Trishuli River in Nepal's Dhading district, killing 18, including two foreigners. The bus, en route to Kathmandu, crashed early Monday morning. Rescue operations faced challenges due to the remote location and darkness. 25 people were injured and hospitalized.
Web Summary : नेपाल के धादिंग जिले में त्रिशूली नदी में एक बस गिरने से 18 लोगों की मौत हो गई, जिनमें दो विदेशी नागरिक भी शामिल हैं। काठमांडू जा रही बस सोमवार सुबह दुर्घटनाग्रस्त हो गई। दुर्गम इलाके और अंधेरे के कारण बचाव कार्य में बाधा आई। 25 घायल अस्पताल में भर्ती।