शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nepal Aircraft Crash: काठमांडूहून पोखऱ्याला ६८ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान क्रॅश, बचाव कार्य सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 11:44 IST

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ आसनी प्रवासी विमान रन वेवर अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ आसनी प्रवासी विमान रन वेवर अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बचावकार्यला सुरूवात करण्यात आली असून विमानतळ बंद करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. यति एअरलाईन्सनंही या वृत्ताला दुजोरा देत अधिक माहिती दिली आहे. 

जुनं विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान अपघातग्रस्त झालेल्या विमानात एकूण ६८ प्रवासी प्रवास करत होते. तसंच यात चार क्रू मेंबर्सदेखील होते, अशी माहिती यति एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन बरतौला यांनी दिली सोशल मीडियाद्वारे समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओनुसार अपघातग्रस्त विमानातून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहे. हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथकही रवाना करण्यात आलेय. प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान एका टेकडीवर आदळले. यानंतर त्यात स्फोट होऊन आग लागली. आगीमुळे लोकांना बाहेर काढण्याच्या कामात अडचणी येत आहेत. अपघाताचे ठिकाण नदीजवळ असल्याचे सांगण्यात येत आहे.तीन दशकांत सात विमान अपघातपोखरा येथे झालेल्या विमान अपघातानंतर त्यासंबंधीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये विमान अपघातानंतर धुराचे लोट स्पष्टपणे दिसून येतात. विशेष म्हणजे नेपाळचे पोखरा विमानतळ अपघातांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जात होते. यापूर्वी येथे अनेक विमान अपघात झाले आहेत. आकडेवारीबाबत सांगायचे झाले तर गेल्या ३० वर्षांत पोखर-जोमसुम मार्गावर सात विमानांचे अपघात झाले आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यातच तारा एअरलाइन्सचे विमान कोसळले होते, ज्या अपघातात क्रू मेंबर्ससह सर्व २२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Nepalनेपाळairplaneविमान