शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:53 IST

Trending Story: अमेरिकेत पोहोचल्यानंतर पाच दिवसांनी, बुधवारी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांनीच केली आहे. ती लग्नासाठी अमेरिकेत आली होती, असे तिच्या व्हिसावरून दिसत आहे, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

अमेरिकेत एका लग्नासाठी आलेली २४ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाली आहे. लिंडेनवोल्ड पोलिसांना सापडलेल्या तिच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मोबाईलमध्ये सारखी पाहत आहे, तसेच एका ठिकाणी ती कोणाची तरी वाट पाहत थांबलेली आहे. यावेळी ती संकटात वगैरे असल्याचे वाटत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

सिमरन नावाची तरुणी २० जून रोजी न्यू जर्सीला लग्नासाठी आली होती. तिला इंग्रजीही बोलता येत नाही आणि अमेरिकेत तिचे कोणी नातेवाईकही नाहीत. फक्त तिच्याकडे आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर चालणारा फोन आहे. तो देखील सध्या बंद येत आहे. अमेरिकेत पोहोचल्यानंतर पाच दिवसांनी, बुधवारी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांनीच केली आहे. ती लग्नासाठी अमेरिकेत आली होती, असे तिच्या व्हिसावरून दिसत आहे, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

द न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हे लग्न म्हणजे अमेरिकेला  येण्यासाठी मोफत विमानभाडे मिळवण्यासाठी एक निमित्त होते का, असा संशय पोलिसांना येत आहे.  याची शक्यताही अधिकारी तपासत आहेत. तिचा फोन केवळ वायफायद्वारेच नेटवर्कशी जोडला जाऊ शकतो. 

या प्रकरणात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, अधिकाऱ्यांना सिमरनच्या भारतातील कोणत्याही कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधता आलेला नाहीय. तिची माहिती मिळविण्यासाठी किंवा ती बेपत्ता झाल्याची माहिती देण्यासाठी संपर्क साधायला तिच्या कुटुंबातील कोणीही सापडलेले नाही. तिला शेवटचे राखाडी स्वेटपँट, पांढरा टी-शर्ट, काळे फ्लिप-फ्लॉप अशा पेहरावात पाहिले गेले होते. सिमरन ही लग्नाच्या निमित्ताने अमेरिकेत आली, फुकट प्रवास करता आला आणि आता ती तिच्या कोणीतरी ओळखीच्या, अफेअर असलेल्या व्यक्तीकडे अमेरिकेतच स्थायिक होण्यासाठी गेली असावी, असा संशय पोलिसांना आला आहे. अमेरिकेत लाखो भारतीय अवैध प्रवासी आहेत, सिमरनदेखील आता याच मार्गावर असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

 

टॅग्स :Americaअमेरिका