शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

Needle Attack In France: फ्रांसमध्ये 100 तरुणींवर सुईने हल्ला, माथेफिरू अटकेत; आता पीडितांची HIV चाचणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 17:07 IST

Needle Attack In France: शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान 20 तरुणींवर सुईने हल्ला करण्यात आला, त्यानंतर रविवारी संशयित आरोपीला अटक झाली.

पॅरिस:फ्रान्समध्ये शंभर तरुणींवर इंजेक्शनच्या सुईने हल्ला केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 20 वर्षीय तरुणावर हल्ला केल्याचा आरोप आहे. शुक्रवारी संध्याकाळी दक्षिण फ्रान्सच्या टूलॉनमधील रिव्हिएरा बीचवर एका टेलिव्हिजन कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान सुईने 20 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी रविवारी या तरुणाला अटक केली. 

ही घटना उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. टूलॉनमधील वकिलांनी सांगितले की, दोन महिलांनी संशयिताला ओळखले आहे. या व्यक्तीवर गंभीर आणि पूर्वनियोजित सशस्त्र हिंसाचाराचा आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपीने प्राणघातक हल्ल्याचे आरोप फेटाळून लावल्याचे सरकारी वकिलांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र साक्षीदारांचे पुरेसे जबाब आहेत, त्यामुळे त्याला न्यायालयात हजर केले जाऊ शकते.

मुलींना टार्गेट केले जात आहेया वर्षाच्या सुरुवातीपासून सुईने हल्ल्याची सुमारे 100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातून मुलींना टार्गेट केले जात आहे. ज्या मुलींना लक्ष्य केले जाते त्यांना मळमळ, चक्कर येणे आणि तीव्र वेदना यासारखी लक्षणे जाणवत आहेत. त्यांच्या त्वचेवर सुई टोचण्याच्या खुणा आढळल्या आहेत. जिथे सुई टोचली जाते तिथे त्वचेचा रंगही बदललेला दिसतो. या हल्ल्यांमध्ये इतरांना वापरलेली सुई टोचली असवी अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

HIV चाचणी होणारबीचवर घडलेल्या घटनेनंतर देशभरातील विविध शहरांमधून अशा अनेक घटना समोर येत आहेत. यात प्रामुख्याने तरुण मुलींना टार्गेट केले जात आहे. आता यातील बहुतेक पीडितांची एचआयव्ही चाचणी केली जाणार असून, अनेकांना हिपॅटायटीससाठी प्रतिबंधात्मक औषधेही देण्यात आली आहेत.

टॅग्स :Franceफ्रान्सInternationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी