शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध, हिंसाचारामुळे जगभरात आठ कोटी लोक विस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:49 IST

संयुक्त राष्ट्र निर्वासित संस्था; समस्येवर तोडगा काढण्याची गरज

संयुक्त राष्ट्र : युद्ध, हिंसाचार, छळ आणि अन्य संकटांमुळे जगभरात २०१९ अखेर ८ कोटी लोकांना विस्थापित व्हावे लागले, असे संयुक्त राष्ट्राच्या निर्वासित संस्थेने म्हटले आहे.एकट्या २०१९ मध्ये १.१ कोटी लोक नव्याने विस्थापित झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांसाठींच्या उच्चायुक्तांनी जागतिक निर्वासित दिनाच्या आधी गुरुवारी जारी केलेल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे. गेल्या एक दशकातील एकूण संख्येच्या ही संख्या दुप्पट आहे.२.४ दशलक्ष लोकांनी अन्य देशांत आश्रय मागितला, तर ८.६ दशलक्ष लोक आपल्याच देशात विस्थापित झाले. अनेक विस्थापितांना नव्याने जीवन सुरू करता आले नाही. केवळ ३,१७,२०० निर्वासितांना आपल्या मूळ देशांत परतता आले, तर १०,७,८०० लोकांना अन्य देशांत बस्तान मांडता आले, असे या अहवालात म्हटले आहे.विस्थापितांचा मुद्दा सर्व देशांशी संबंधित आहे. आकडेवारीनुसार गरीब देशांतील ८५ टक्के लोकांना राहती घरे सोडावी लागली. हा जागतिक मुद्दा असला तरी गरीब देशांसाठी सर्वाधिक आव्हानात्मक आहे.कोरोनामुळे मोठ्या संख्येने स्थलांतर होत असल्याने लोक संकटात आहेत, यात शंका नाही, असे फिलिप्पो ग्रॅण्डी यांनी जिनेव्हामध्ये पत्रकारांशी बोलताना नमूद केले. युद्ध, हिंसाचार, अत्याचार आदी कारणांमुळे निर्वासित झालेल्या ८ कोटी लोकांचे रक्षण करणे, ही सर्व देशांची मूलभूत जबाबदारी आहे, असे संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनियो गुटेरेस यांनी जागतिक निर्वासित दिनानिमित्त संदेश देताना सांगितले. निर्वासितांना आसरा देणाऱ्या देशांचीही त्यांनी प्रशंसा केली.जगभरात २०१९ पर्यंत ८ कोटी किंवा शंभर लोकांपैकी एक जण विस्थापित झाला. जगभरात विस्थापित होणाऱ्या लोकांची ही संख्या एका दशकातील दुप्पट आहे. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या एक टक्का आहे, असे संयुक्त राष्ट्र निर्वासित आयुक्त फिलिप्पो ग्रॅण्डी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघ