शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ यांच्या अडचणी वाढल्या; जावयाला झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 10:03 IST

पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शरीफ यांचे जावई कॅप्टन मोहम्मद सफदर यांना सोमवारी पहाटे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (नॅब) पथकाने अटक केली.

नवी दिल्ली- पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. शरीफ यांचे जावई कॅप्टन मोहम्मद सफदर यांना सोमवारी पहाटे नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (नॅब) पथकाने अटक केली. पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे. पनामा पेपर्सप्रकरणात नवाझ शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात खटले दाखल करण्याचे आदेश पाकमधील सुप्रीम कोर्टाने जुलैमध्ये दिले होते. यानंतर नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. सोमवारी पहाटे शरीफ यांची मुलगी मरियम आणि जावई सफदर हे दोघे कतार एअरलाईन्सच्या विमानाने बेनझिर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. मरियम यांच्या स्वागतासाठी पाकिस्तान मुस्लीम लीग – नवाझ या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरीफ कुटुंबियांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही सुरु होती. याच दरम्यान नॅबच्या सहा अधिकाऱ्यांचं पथक विमानतळावर पोहोचलं आणि त्यांनी सफदर यांना अटक केली. तर मरियम यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

कॅप्टन मोहम्मद सफदर यांना पनामा पेपरप्रकरणात कोर्टाने समन्स बजावलं होतं. पण त्यानंतरही कोर्टात हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं होतं. सफदर यांच्या अटकेनंतर सोमवारी सकाळी मरियम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती मिळते आहे. तर सफदर यांच्याकडूनही कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल होईल, असं स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटलं आहे.

पनामा पेपर्समध्ये नवाज शरीफ यांनी लंडनच्या उच्चभ्रू वस्तीत मालमत्ता खरेदी केल्याचं समोर आलं होतं. शरीफ यांच्या मुलांच्या परदेशात कंपन्या असून शरीफ कुटुंबाची चार महागडी घर असल्याची माहिती उघड झाली होती. याप्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. जुलैमध्ये सुप्रीम कोर्टाने याप्रकरणात निकाल दिला होता. शरीफ यांचे पुत्र हुसेन आणि हसन, कन्या मरियम, जावई मोहम्मद सफदर, शरीफ यांचे विश्वासू साथीदार इसाक दार यांना सुप्रीम कोर्टाने दोषी ठरवलं होतं.

काय आहे पनामा पेपर्सप्रकरण ?पनामा या देशातील ‘मोझॅक फॉन्सेका’ या कायदा सल्लागार कंपनीची ११. ५ दशलक्ष गोपनीय कागदपत्रं उघड झाली होती. यात जगभरातील राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, सिनेस्टार, क्रिकेटर्स यांनी मालमत्ता लपवण्यासाठी आणि कर चुकवण्यासाठी पनामा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स, जर्सी, बहामा आणि सेशल्स बेट या देशांमध्ये बोगस कंपन्यांमार्फत पैसा गुंतवला होता.

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफ