शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

नवाज शरीफ यांच्या घराजवळ आत्मघातकी हल्ला, 5 पोलिसांसह 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 07:18 IST

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घराजवळच हा हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात 5 पोलिसांसह एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

लाहोर : पाकिस्तानचे पदच्यूत पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या येथील बंगल्याजवळील पोलिसांच्या तपासणी नाक्यावर किशोरवयीन तालिबान्याने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सहा पोलिसांसह नऊ जण ठार झाले. मृतांत दोन पोलीस निरीक्षक व तीन कॉन्स्टेबल्स आहेत. हा हल्ला बुधवारी रात्री झाला. त्यात २५ जण जखमी झाले असून, त्यात १४ पोलिस कर्मचारी आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक आहे.शरीफ कुटुंबियाच्या मालकीच्या भव्य निवासस्थानाच्या जवळच पोलीस तपासणी नाका आहे. पोलिसांनी सांगितले की, किशोरवयीन आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. किमान १४ पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित होते. या मुलाचे नेमके वय समजलेले नाही. या हल्ल्याचे लक्ष्य पोलीस कर्मचारी होते. हल्लेखोर मुलाच्या मृत शरीराचे भाग ताब्यात घेण्यात आले आहेत. हा स्फोट खूपच शक्तिशाली होता व त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला.नवाझ शरीफ यांच्या निवासस्थानाच्या जवळ तबलिघी जमातने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, तबलिघी जमातच्या मेळाव्यात शिरण्याचा चार संशयित अतिरेक्यांनी प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी अडवल्यावर त्यांच्यापैकी एकाने स्वत:ला उडवून घेतले, तर इतर घटनास्थळावरून पळून गेले.हल्ले करीतच राहू : तालिबानची धमकीघटनास्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न एक मुलगा करीत होता. माझ्या सहकाऱ्याने त्याला अडवले व तेवढ्याच शक्तिशाली स्फोट झाला. आवाजाने मी बेशुद्ध पडलो, असे कॉन्स्टेबल हुस्सेन म्हणाले. हा हल्ला आम्ही केल्याचा दावा ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने’ केल्याचे काही वृत्तांत म्हटले आहे. असे आणखी हल्ले पोलिसांवर केले जातील अशी धमकीही बंदी असलेल्या या संघटनेने दिली आहे.>भारतात मुत्सद्यांचा छळ होत असल्याची पाकची ओरडइस्लामाबाद : भारतात पाकिस्तानी मुत्सद्यांचा छळ होत असल्याची तक्रार करीत, पाकिस्तानने आपल्या दिल्लीतील राजदूताला मायदेशी बोलावले आहे. भारतातील पाकचे राजदूत सोहेल महमूद यांना अनिश्चित काळासाठी बोलावले आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात एकमेकांच्या मुत्सद्यांचा छळ होत असल्याचा वाद सुरू आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मुहम्मद फैसल म्हणाले की, पाकिस्तानी मुत्सद्दी, त्यांचे कुटुंबीय व कर्मचा-यांना भारताच्या गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या धमक्यांची नोंद घेण्यात भारत सरकारला अपयश आले आहे. पाकने दिल्लीतील मुत्सद्यांना काम करणे कठीण झाल्याचा दावा केला आहे. त्याआधी भारताच्या पाकमधील मुत्सद्यांना पाकिस्तानी गुप्तचर संघटना त्रास देत आहे, असा आरोप भारताने केला होता. पाकमधील भारतीय निवासी संकुलावर आयएसआयने छापा घातल्याने वाद निर्माण झाला होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानterroristदहशतवादी