शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवाझ शरीफ यांनीच आपल्या भावाचा पंतप्रधानपदाचा पत्ता कापला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 16:58 IST

नवाझ शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांचे बंधु शहाबाज शरीफ यांच्याकडे नवाझ यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते.

ठळक मुद्देनवाझ शरीफ यांनी आपले बंधू शहाबाज यांनाच दूर ठेवले नाही तर, शहाबाज यांचा मुलगा हमझा शरीफचेही स्वप्न मोडले. पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांच्या निवडीमुळे तूर्तास पिता-पुत्राचे स्वप्न भंगले आहे. 

लाहोर, दि. 5 - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवाझ शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांचे बंधु शहाबाज शरीफ यांच्याकडे नवाझ यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. पण आता पाकिस्तानात नवाझ शरीफ यांनी स्वत:च आपले बंधू शहाबाज शरीफ यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवल्याची चर्चा रंगली आहे. शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षातील अनेक नेत्यांचे तसे ठाम मत असून, डॉन या पाकिस्तानी वर्तमानपत्राने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. 

नवाझ शरीफ यांनी आपले बंधू शहाबाज यांनाच दूर ठेवले नाही तर, शहाबाज यांचा मुलगा हमझा शरीफचेही स्वप्न मोडले. शहाबाज यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर पंजाब प्रातांची जबाबदारी आपल्याला मिळेल असा हमजा याचा कयास होता. पण पंतप्रधानपदी शाहीद अब्बासी यांच्या निवडीमुळे तूर्तास पिता-पुत्राचे स्वप्न भंगले आहे. 

शहाबाज शरीफ पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री असून हा प्रांत पीएमएल-एऩ पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शहाबाज संसदेवर निवडून जाईपर्यंत फक्त 45 दिवसांसाठी शाहीद अब्बासी पाकिस्तानचे पंतप्रधान असतील असे सांगण्यात येत होते. पण आता शहाबाज यांची पंजाब प्रांताला गरज आहे अशा प्रकारचे कॅम्पेन सुरु झाले आहे. शहाबाज पाकिस्तानचे पंतप्रधानपद स्विकारणार नाहीत याची फक्त औपचारीक घोषणा बाकी राहिली आहे असे पीएमएल-एन पक्षातील काही नेत्यांनी सांगितले. 

नवाज शरीफ हे पनामागेट या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात दोषी असून, ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहू शकत नाहीत, असा आदेश येथील सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे नवाज शरीफ यांना नाइलाजाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. नवाज शरीफ यांच्या कुटुंबीयांनाही न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरविले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवाज शरीफ यांनी कुरकुर करीतच राजीनामा दिला. न्यायालयाने सांगितले म्हणून आपण राजीनामा देत आहोत, पण आपण काहीही गैर केलेले नाही, असे शरीफ म्हणाल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला कुठेच आव्हान देणे शक्य नसल्याने त्यांनी नाइलाजाने राजीनामा दिला.

नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा गैरवापर करून आणि मनी लाँडरिंगद्वारे लंडन व अन्यत्र ज्या मालमत्ता विकत घेतल्या, त्या पनामागेट प्रकरणातून उघडकीस आल्या होत्या. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या मालमत्तांचाही पनामागेटमध्ये उल्लेख होता. शरीफ यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केल्यानंतर इम्रान खान यांच्या तेहरिक-ए- इन्सान या पार्टीतर्फे तसेच अन्य संघटनांतर्फे शरीफ यांच्या पनामागेट प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी याचिका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमले.