शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

नवाज शरीफ आणि मरियम यांना लाहोर विमानतळावर अटक, पाकिस्तानात तणावाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 9:42 PM

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली आहे. 

लाहोर :  बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना लाहोर विमानतळावर अटक करण्यात आली. पाकिस्तानातील एएनबीने अटकेची ही कारवाई केली.नवाज शरीफ आणि मरियम यांना लाहोर विमानतळावर अटक केल्यानंतर त्यांना विशेष विमानाने इस्लामाबादला नेण्यात आले. दरम्यान, नवाज शरीफ यांच्या अटकेच्या पाश्वभूमीवर पाकिस्तानात मोठा तणाव निर्माण झाला असून लाहोरमध्ये काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तसेच, नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने विमानतळ परिसरात जमले आहेत. तर, काही ठिकाणी हिंसकवळण आले असून पोलिसांनी 378 जणांना ताब्यात घेतले आहे. याचबरोबर, लाहोर विमानतळाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. 

 

दरम्यान, नवाज शरीफ आणि मरियम सुरुवातीला लंडनहून अबुधाबीला पोहोचले. त्यानंतर अबुधाबीहून संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास इतिहाद एअरवेजचे विमानाने लाहोरला रवाना झाले. अबुधाबीहून नवाज शरीफ आणि मरियम नवाज यांच्यासोबत नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोचे अधिकारी सुद्धा विमानात होते.  तसेच, नवाज शरीफ आणि मरियम यांना लाहोर विमानतळावर आल्यानंतर अटक करण्यात येणार असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले होते. 

या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये नवाज शरीफ यांना न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर, मरियम शरीफ हिला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबरोबर, नवाज शरीफ यांना 8 मिलियन पाऊंडचा दंड, तर मरियमला 2 मिलियन पाऊंडच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. 

 

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तान