शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

जागतिक सुरक्षिततेसाठी चीन धोकादायक, NATO देशांनी व्यक्त केली चिंता; ड्रॅगननं दिलं असं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 19:44 IST

नुकत्याच ब्रुसेल्स येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेतील नेत्यांनी म्हटले होते, की चीन जागतिक सुरक्षिततेसाठी धोनादायक बनला आहे. एवढेच नाही, तर चीन आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारलेल्या व्यवस्थेला कमकूवत करण्याचे काम करत आहे, असेही नाटोने आपल्या निवेदनात म्हटले होते.

पेइचिंग/ब्रुसेल्स - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडी असलेल्या नाटो आणि चीन यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. नुकत्याच ब्रुसेल्स येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेतील नेत्यांनी म्हटले होते, की चीन जागतिक सुरक्षिततेसाठी धोनादायक बनला आहे. एवढेच नाही, तर चीन आंतरराष्ट्रीय नियमांवर आधारलेल्या व्यवस्थेला कमकूवत करण्याचे काम करत आहे, असेही नाटोने आपल्या निवेदनात म्हटले होते. यावर उत्तर देत, आम्ही शांततेसाठी काम करतो आणि स्व-संरक्षणासाठी पूर्णपणे तयार आहोत, असे चीनने म्हटले आहे. (NATO VS China NATO declare china a global security challenge beijing accuses NATO of exaggerating china threat theory)

चीनचं नाटोला उत्तर -चीनच्या ब्रुसेल्स येथील मिशनने म्हटले आहे, की नाटोचे वक्तव्य हे चीनच्या शांतीपूर्ण विकासाला बदनाम करणारे आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे आणि स्वत: नाटोच्या भूमिकेचे चुकीचे आकलन करणारे आहे. याच बोरबर, शीतयुद्धचा विचार तथा संघटनात्मक राजकीय मनोवृत्ती दर्शवणारेही आहे. नाटोतील सदस्य देशांच्या तुलनेत पेइचिंग आपल्या सैन्यावर अत्यंत कमी खर्च करते, असेही चीनने म्हटले आहे.

G7: आता लहान समूह जगावर राज्य करू शकत नाहीत; चीनने दिला इशारा शांतता कायम रखण्याचा अधिकार सोडणार नाही -चीनने नाटो देशांना इशारा देत म्हटले आहे, की चीन शांतता कायम ठेवण्याचा अधिकार कधीही सोडणार नाही. मात्र, आपले सार्वभौमत्व, सुरक्षितता आणि विकास हितांचे दृढतेने संरक्षण करेल. चीनचा हा इशारा, अमेरिके, इंग्लंडसह युरोपातील अशा देशांसाठीही असल्याचे मानले जात आहे, जे दक्षीण चीन सागरात लढाऊ युद्धनौका तैनात करण्याचा विचार करत आहेत.

नाटो नेत्यांनी सोमवारी एक निवेदन जारी करत म्हटले होते, की चीनच्या लक्ष्य आणि दबाव वाढविणाऱ्या व्यवहाराने नियमांवर आधारलेल्या जागतीक व्यवस्थेसमोर आव्हान उभे केले आहे. आणि संयुक्त संरक्षण असलेल्या भागांतही हा चिंतेचा विषय आहे. मात्र, 30 देशांचे सरकार आणि प्रमुखांनी चीनला प्रतिस्पर्धक म्हटले नाही. पण, चीनच्या दबाव टाकणाऱ्या धोरणावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

Love Story : 10वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहोचला स्वित्झर्लंडला! फिल्मी आहे संपूर्ण स्टोरी

चीनकडून अनेक देशांना धोका!तत्पूर्वी, जी-७ गटात सहभागी असलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी चीनच्या मुद्द्यावरून चर्चेला सुरुवात केली. त्यांनी सर्व सहभागी देशांना आवाहन करत म्हटले आहे, की चीनपासून अनेक देशांना धोका आहे आणि हा धोका ओळखून संयुक्तरित्या पावले उचलायला हवीत. तसेच दुसरीकडे जी-७ देशांच्या बैठकीत चीनला रोखण्यासाठी काय उपाय करता येतील, याची रणनीती तयार केली जात असल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाEnglandइंग्लंडCanadaकॅनडा