शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘नाटो’ने ऐनवेळी मदत नाकारून माझ्या मनावर ओरखडा उमटवला! ट्रम्प यांचा नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:52 IST

इराण युद्धात सहकारी अन् मित्रराष्ट्रांनी मदत न केल्याने ट्रम्प निराश, ‘नाटो’ म्हणजे केवळ कागदी वाघ असल्याची टीका; ट्रम्पविरोधात आणखी एका कायद्याचा आधार घेण्याची शक्यता

वॉशिंग्टन: इराण युद्धात ‘नाटो’ संघटनेतील सहकारी देश आणि द. कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया या अन्य दोस्त राष्ट्रांनी मदत न केल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या देशांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला. त्यांनी ‘नाटो’ला ‘कागदी वाघ’ असेही संबोधले. व्हाइट हाउसमध्ये सोमवारी ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ‘नाटो’ने त्यांच्या एकूण कारभारावरून माझ्या मनावर ओरखडा उमटवला असून, तो मी कधीही विसरू शकणार नाही. जेव्हा मी त्यांच्याकडे मदतीसाठी गेलो तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला, अशी नाराजी बोलून दाखवली.

शिवराळ भाषेवर ट्रम्प ठाम

ट्रम्प यांनी इराण युद्धादरम्यान वापरलेल्या अपशब्द आणि ‘क्रेझी बास्टर्ड्स’ सारख्या भाषेवर जेव्हा प्रश्न विचारले गेले, तेव्हा त्यांनी टीकाकारांना जुमानले नाही. ते म्हणाले, देशाला माझ्यासारख्याच लोकांची गरज आहे; गेली अनेक वर्षे अमेरिकेची व्यापार आणि अन्य बाबींत फसवणूक होत होती.

२५वी घटनादुरुस्तीचे हत्यार?

ट्रम्प यांच्या वाढत्या आक्रमक भाषेमुळे आणि मानसिक स्थितीवरून अमेरिकेत विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मंत्रिमंडळाकडे ‘२५ व्या घटनादुरुस्ती’ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या दुरुस्तीनुसार, जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपली कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ असतील किंवा त्यांची मानसिक स्थिती योग्य नसेल, तर त्यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू करता येते.

‘व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो’

या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी गमतीने आपण व्हेनेझुएलामध्ये प्रचंड लोकप्रिय असून, अमेरिकेतील आपला कार्यकाळ संपल्यानंतर ते तिथे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा विचार करू शकतात, असे विधान केले. व्हेनेझुएलामध्ये आजवरच्या कोणत्याही नेत्यापेक्षा आपल्याला जास्त लोकप्रियता (पोल रेटिंग) मिळू शकते. मी लवकरच स्पॅनिश भाषा शिकेन. मी व्हेनेझुएलाला जाईन आणि निवडणूक लढवेन, असे ट्रम्प मिस्कीलपणे म्हणाले.

ट्रम्प यांची काही वक्तव्ये

  • पुतिन यांना भीती नाही : ‘नाटो’ हा असा कागदी वाघ आहे, ज्याला व्लादिमीर पुतीनसुद्धा घाबरत नाहीत. 
  • ग्रीनलँडचा मुद्दा : आम्हाला ग्रीनलँड हवे होते; पण त्यांनी ते देण्यास नकार दिला. मग मी त्यांना गुड बाय’ म्हटले. 
  • मित्रराष्ट्रांवर टीका : जपानमध्ये ५०,००० व दक्षिण कोरियात ४५,००० अमेरिकन सैनिक तैनात असूनही या दोन देशांनी मदत केली नाही. 

इस्रायली दूतावासावर हल्ला; ३ हल्लेखोर ठार

इस्तंबूल: इस्तंबूलमधील इस्रायली दूतावासावर मंगळवारी तीन हल्लेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत ३ हल्लेखोर ठार झाले असून या चकमकीत दोन पोलिस जखमी झाल्याची माहिती तुर्कीयेच्या अधिकाऱ्यांनी दिली. हल्लेखोरांकडे लांब पल्ल्याची शस्त्रे होती. हल्लेखोरांनी शेजारील इझमित शहरातून भाड्याने घेतलेल्या कारने इस्तंबूलमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा संबंध एका धर्मांध गटाशी असल्याचे तुर्कीयेने म्हटले आहे.

‘युद्धविरामाचे पाकिस्तानचे प्रयत्न ‘निर्णायक’ टप्प्यावर’

इस्लामाबाद : इराणविरुद्ध सुरू असलेले अमेरिका-इस्रायल युद्ध संपवण्यासाठी पाकिस्तानच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले शांतता प्रयत्न आता एका ‘निर्णायक’ टप्प्यावर पोहोचल्याचे इराणचे इस्लामाबादमधील राजदूत रेझा अमिरी मोघदाम यांनी मंगळवारी सांगितले. पाकिस्तान युद्धविराम घडवून आणण्याचा आणि त्यानंतर सविस्तर चर्चा करण्याचे निकराचे प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजदूतांचे हे विधान आले आहे.

पाकिस्तानची नवी योजना

  • चतुष्कोणीय बैठक : इस्लामाबादमध्ये सौदी अरेबिया, तुर्कीये, इजिप्त व पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली.
  • चीनचा सहभाग : पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात महत्त्वाची बैठक झाली.
  • पाच कलमी योजना : दार व वांग यांनी युद्धविराम व चर्चेवर आधारित ‘पाच कलमी शांतता योजना’ जाहीर केली.
English
हिंदी सारांश
Web Title : Trump Criticizes NATO for Lack of Support in Iran Conflict.

Web Summary : Trump slammed NATO for refusing help in the Iran conflict, calling it a 'paper tiger.' He also addressed criticism over his language and the possibility of a 25th Amendment challenge. Pakistan is trying to mediate peace.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिकाIranइराण