शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

परदेशातून शरद पवारांना पाठिंबा! राष्ट्रवादीचे शिलेदार म्हणतात, “आम्ही साहेबांसोबत”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 11:28 IST

Sharad Pawar NCP: आता परदेशातून शरद पवार यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

Sharad Pawar NCP: अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट झाले आहेत. यातच आता परदेशातून शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. 

देशाच्या आर्थिक उन्नतीमध्ये व अर्थ व्यवस्थेमध्ये अनिवासीय भारतीयांचा वाटा खूप मोठा आहे. जगामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये जवळपास ४ ते ५  करोड अनिवासीय भारतीय राहतात.यामध्ये जवळपास ३० ते ४० टक्के हा कामगार, ४०  - ५० टक्के नोकरदार वा ५-१० टक्के हा उद्योजग वर्ग आहे.या सर्व अनिवासीय भारतीयांमध्ये शरद पवार यांना मानणारा खूप मोठा वर्ग हा भारताबाहेर बसला आहे. शरद पवार यांनी IT व उत्पादन उद्योग  क्षेत्रामध्ये  महाराष्ट्रामध्ये जी क्रांती आणली आज त्याचाच परिणाम आहे की महाराष्ट्रातलेच नाहीतर संपूर्ण भारतामधील बऱ्याच युवकांना परदेशात खूप चांगल्या नोकरीच्या व व्यावसायिक  संधी उपलब्ध झाल्या. या अनिवासी भारतीयांनी शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस  डिपार्टमेंट ऑफ ओव्हरसीज  इंडियनची स्थापना अनिवासीय भारतीयांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस  डिपार्टमेंट ऑफ ओव्हरसीज  इंडियन ची स्थापना २००० साली केली. राष्ट्रवादी डिपार्टमेंट ऑफ व्हर्सेस इंडियन गेली कित्येक वर्ष अनिवासीय भारतीयांच्या मदतीसाठी वा हितासाठी जगभर काम करत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आखाती देश (यूएई, सौदी अरेबिया, ओमान, कतार, कुवैत, बहरैन),दक्षिण पूर्व  आशियाई देश (सिंगापोरे, थायलंड, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशिया), उत्तर आशियाई देश ( जपान, हॉंगकॉंग , तैवान ), उत्तर आणि दक्षिण यूरोप, युनाइटेड किंग्डम (लंडन) , उत्तर अमेरिका ( कॅनडा वा अमेरिका ) या देशात या डिपार्टमेंट चे कार्यकर्ते अनिवासीय भारतीयांच्या मदतीसाठी काम करत आहेत.

शरद पवार यांनी केलेली मदत अनिवासी भारतीय कधीच विसरू शकत नाही

राष्ट्रवादीच्या डिपार्टमेंट ऑफ व्हर्सेस इंडियन तर्फे शरद पवार यांनी महाराष्ट्रातील अनिवासीय भारतीयांना कोरोना काळात केलेली मदत हे अनिवासीय भारतीय कधीच विसरू शकणार नाहीत. अनिवासीय भारतीयांना  चार्टर्ड flight clearance असो वा मुंबई मध्ये क्वारंटाईन मध्ये सूट असो वा परदेशामध्ये काही ना काही कारणाने अन्याय झालेल्या पीडितांना मदत वा आवाज सरकार तर्फे पोहोचवायचा असेल, अशा बऱ्याच गोष्टींना पवार साहेबानी पुढे येऊन मदत केली. अशी शेकडो अनिवासीय भारतीयांची कामे आहेत जी शरद पवार यांनी केली ती मीडियात कधी आलीच नाहीत. 

शरद पवार यांनी काम करण्याची प्रेरणा वेळोवेळी दिली

राष्ट्रवादी डिपार्टमेंट ऑफ ओव्हरसीज इंडियनचे अध्यक्ष अभिजित इगावे जे दुबई मध्ये कार्यरत असतात, त्यांनी आम्हाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, आम्हाला या सामाजिक प्रवाहात साहेबानी आणले व समाजासाठी/अनिवासीय भारतीयांसाठी  काम करण्याची संधी उपलब्द करून दिली. गुरुवर्य साहेबानी आम्हाला सामाजिक कार्याचा मार्ग दाखविला, अनिवासीय भारतीयांसाठी काम करण्याची प्रेरणा वेळोवेळी दिली, असे ते म्हणाले.

दरम्यान, या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात  घडलेल्या राजकीय परिस्थितीमुळे आम्हाला वेदना झाल्या व खूप  संताप पण आलेला आहे. इथून पुढे नवीन ऊर्जेने व आत्मविश्वासाने आम्ही सर्व राष्ट्रवादी डिपार्टमेंट ऑफ ओव्हरसीजचे सर्व कार्यकर्ते शरद पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून, त्यांच्या छत्र छायेखाली, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व आदरणीय शरद पवार विचारधारेशी प्रामाणिक राहून, भारताबाहेर सामाजिक कार्य करत राहू व शरद पवार यांचे सामाजिक विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया अभिजित इगावे, दुबई यांनी आमच्याशी बोलताना दिली.    

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस