शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

उत्तर प्रदेशच्या गुप्ता परिवारामुळं गेली दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांची खुर्ची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 11:16 IST

अनेक घोटाळ्यांनी कलंकित झालेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

जोहनसबर्ग - उत्तर प्रदेशच्या गुप्ता परिवारामुळं दक्षिण आफ्रिकेच्या जेकब झुमा यांना राष्ट्राध्यक्ष पद सोडावं लागले. दक्षिण आफ्रिकेत औद्योगिक वसाहत तयार करणारे भारताच अजय गुप्ता यांच्यासह त्यांच्या तीन भावाच्या घरी जोहनसबर्ग पोलिसांनी काल छापा मारला. गुप्ता परिवारातील एका सदस्याला यावेळी अटकही करण्यात आली आहे. याचवेळी सत्तेत असलेल्या आफ्रिकी नॅशनल काँग्रेसने झुमा यांना पद सोडण्यासाठी सांगितले. गुप्ता परिवारावर झुमा यांच्यासोबत घोटाळा केल्याचा आरोप आहे. गुप्ता परिवार उत्तरप्रदेशमधील सहारनपुरमधील आहे.

1993मध्ये उद्योगासाठी गुप्ता परिवाराने दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर केलं होतं. तरुण वयामध्ये अजय गुप्ता यांची काहीतरी मोठं करण्याची जिद्द त्यांना दिल्लीतून आफ्रिकेत घेऊन गेली. राजोश आणि अतुल या दोन भावासोबत त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सहारा कंप्यूटर्सची स्थापना केली. यामधून फायदा होताच अनेक कंपन्यासोबत मिळून त्यांनी आपलं काम सुरु केलं. लग्जरी गेम, वृत्तमान पत्र, न्यूज चॅनलमध्ये आपली भागिदारी केली. अजेय गुप्ता यांच्यावर दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेक भष्ट्राचाराचे आरोप आहेत. यामध्ये राष्ट्रपती झुमा यांचाही संबध असल्याचे समोर आलं आहे. पण झुमा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. झुमा म्हणाले की, गुप्ता परिवाराशी माझे कोणतेही व्यवसायिक संबध नाहीत, त्यांच्यासोबत माझे फक्त मैत्रीचे नाते आहेत. 

पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सलग १३ तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर मंगळवारी पहाटे झुमा यांना पदावरून दूर करण्यावर पक्षात एकमत झाले.  आज झुमा यांनी राष्ट्रध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.  या अनिश्चितीमुळे दक्षिण आफ्रिकेची सूत्रे सध्या नक्की कोणाच्या हाती आहेत, हे कळेनासे झाले आहे. दरवर्षी राष्ट्राध्यक्षांकडून संसदेपुढे केले जाणारे ‘स्टेट आॅफ दि नेशन’ भाषण झाले नाही. आता २१ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पाचे काय होणार याविषयी नागरिक साशंक आहेत. त्यातच पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. सन १९९४ मध्ये वर्णभेदी गोरी राजवट अस्ताला जाऊन दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाची पहिली निवडणूक झाली तेव्हा नेस्लन मंडेला यांच्या उत्तुंग नेतृत्वाने सत्तेवर आलेला ‘एएनसी’ हा पक्ष आताही सत्तेवर आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये या पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला होता. मंडेला यांच्या नंतर राष्ट्राध्यक्ष झालेल्या थाबो एमबेकी यांना सत्तेच्या दुरुपयोगाच्या आरोपावरून झुमा समर्थकांनी पक्ष संघटनेतील ‘रिकॉल’च्या अधिकाराचा वापर करून पदावरून दूर केले होते. आता तेच अस्त्र झुमा यांच्यावर उगारण्यात आले आहे. 

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाPresidentराष्ट्राध्यक्ष