शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:29 IST

Ex-CIA Larry Johnson Claim: अमेरिकेने नतांज अणू प्रकल्पावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा लॅरी जॉन्सन यांनी केला आहे. इराणने एकाच दिवसात ४०० दशलक्ष डॉलर्सची अमेरिकन विमाने कशी नष्ट केली?

इराणमध्ये घुसून आपल्या वैमानिकाला वाचवल्याबद्दल ट्रम्प सरकारचे कौतुक होत असतानाच, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी लॅरी जॉन्सन यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. "पेंटागन जगाला खोटे सांगत आहे, अमेरिकेचे 'रेस्क्यू मिशन' हे मोठे अपयश असून एकाच दिवसात इराणने अमेरिकेची १० विमाने पाडली आहेत," असा दावा जॉन्सन यांनी केला आहे.

नतांज अणू प्रकल्पावर हल्ल्याचा कट?लॅरी जॉन्सन यांच्या मते, पाडलेले F-15 फायटर जेट कोणत्याही साध्या गस्तीवर नव्हते, तर ते इराणच्या नतांज या अतिसंवेदनशील अण्वस्त्र प्रकल्पावर 'ग्राउंड अटॅक' करण्याच्या तयारीत होते. इराणने हे विमान वेळीच ओळखून आकाशातच उडवले. या घटनेनंतर अमेरिकेची खरी अडचण सुरू झाली.

एका दिवसात ४०० मिलियन डॉलर्सचा धूर!जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने केवळ एका वैमानिकाला वाचवण्याच्या नादात आलेल्या अमेरिकन ताफ्याचा चक्काचूर केला आहे. यात खालील विमानांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला आहे:

F-15 फायटर जेट - १

२ ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स - २

C-130 ट्रान्सपोर्ट विमाने - २

लिटिल बर्ड्स (लहान हेलिकॉप्टर्स) - ४

A-10 वॉरथॉग विमान - १ 

एकाच दिवसात सुमारे ४०० मिलियन डॉलर्स (३३०० कोटी रुपयांहून अधिक) किमतीची अमेरिकन युद्धसामग्री इराणने नष्ट केली आहे.

'रेस्क्यू मिशन' की मोठी आपत्ती?जॉन्सन यांनी तांत्रिक प्रश्न उपस्थित करत विचारले की, जर कुवेत ते इस्फहान हे अंतर २५० मैल असेल आणि विशेष दलांची रेंज ३०० मैल असेल, तर ही विमाने परत कशी जाणार होती? त्यांच्या मते, C-130 विमाने इंधनासाठी आली होती आणि संपूर्ण ऑपरेशन वाळवंटात अडकल्यामुळे फसले.

वॉर सेक्रेटरी पीट हेगसेथ यांच्यावर राजीनाम्यासाठी दबावलष्करी अपयशानंतर अमेरिकन संसदेत रणकंदन माजले आहे. रिपब्लिकन नेते कारबजल यांनी संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांना चक्क "देशासाठीची लाज" म्हटले आहे. लष्करी प्रमुखांना पदावरून हटवल्यामुळे आणि इराण युद्धात झालेल्या नुकसानीमुळे हेगसेथ आता "अनफिट" असल्याचे आरोप होत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran downed 10 US planes? Ex-CIA officer's sensational claim.

Web Summary : Ex-CIA officer claims Iran downed 10 US planes during a failed rescue mission near Natanz nuclear facility, costing America $400 million. Calls for War Secretary's resignation follow.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्ध