शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 06:01 IST

Israel Hizbullah WAr: नसरल्ल्लाने तीन दशकांपेक्षाही अधिक काल दहशतवादी संघटना हिजबुल्लाचे नेतृत्व केले. त्याच्या मृत्यूमुळे मध्य पूर्वेतील संघर्ष नाट्यमयरीत्या बदलू शकतो. 

बैरुत : इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुतवर केलेल्या हवाई हल्ल्यात कट्टरपंथी संघटना हिजबुल्ला नेता हसन नसरल्ला ठार झाल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला. हल्ल्यात नसरल्ल्ला यांचा खात्मा झाल्याची पुष्टी केली आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नसरल्ला आपले सहकारी शहिदांमध्ये सामील झाले. हिजबुल्लाह शत्रू विरोधात आणि पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ युद्ध सुरू ठेवण्याची शपथ घेत आहे, असेही यात म्हटले आहे. 

नसरल्ल्लाने तीन दशकांपेक्षाही अधिक काल दहशतवादी संघटना हिजबुल्लाचे नेतृत्व केले. त्याच्या मृत्यूमुळे मध्य पूर्वेतील संघर्ष नाट्यमयरीत्या बदलू शकतो. हसन नसरल्ल्लाची चार मुलंही हिजबुल्लाशी संबंधित होती. त्याचा मोठा मुलगा हिजबुल्ला सेनानी होता आणि तो १९९७ मध्ये इस्रायली हल्ल्यात मारला गेला. 

खामेनेईंचे टेन्शन वाढले हिजबुल्लाचा प्रमुख सय्यद हसन नसरल्लाचा ‘खात्मा’ झाल्याने आता इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहेे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

मुलगी जैनबचाही मृत्यूइस्रायली वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, नसरल्लाशिवाय त्यांची मुलगी जैनबचाही या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे.इस्रायलने हल्ला केलेल्या कमांडर सेंटरमध्ये नसरल्लाच्या मुलीचा मृतदेह सापडला होता.

नसरल्ला कोण होता?

  • ६४ वर्षीय नसरल्ला याचा जन्म बैरूतच्या शारशाबौकमध्ये एका गरीब शिया मुस्लीम कुटुंबात झाला होता. 
  • लेबनॉनमधील गृहयुद्धामुळे लहानपणीच त्याच्या कुटुंबाला विस्थापित व्हावे लागले. 
  • वक्तृत्व व संघटन कौशल्याच्या बळावर तो एक क्रांतिकारक म्हणून उदयास आला. वयाच्या १६ व्या वर्षी तो इराकमधील नजफमध्ये गेला.
  • इराणी क्रांतिकारक अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्याकडून त्याने इस्लामचे शिक्षण घेतले. हिजबुल्लाची स्थापना करणाऱ्या मोजक्या संस्थापकांत नसरल्लाचा समावेश होता. 
  • नसरल्लाच्या पश्चात पत्नी फातिमा यासीन, तीन मुले जवाद, मोहंमद-माहदी व मोहंमद अली आणि एक मुलगी जैनब असा परिवार आहे. 
टॅग्स :Israelइस्रायलterroristदहशतवादी