शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘नासा’चे ‘अपॉर्च्युनिटी’ रोव्हर मंगळावर ‘मृत’ झाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:45 IST

धुळीच्या वादळाने हानी; चार्जिंग बंद पडल्याने सात महिन्यांपासून संपर्क तुटला

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ‘नासा’ अंतराळ संशोधन संस्थेने १५ वर्षांपूर्वी मंगळावर पाठविलेले ‘अपॉर्च्युनिटी’ रोव्हर सौर बॅटऱ्यांचे चार्जिंग बंद झाल्याने कायमचे ‘मृत’ झाले असावे, अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.हे रोव्हर सौरऊर्जेवर चालते. त्यात सूर्यप्रकाशापासून ऊर्जा तयार करून बॅटऱ्या चार्ज करून घेण्याची व्यवस्था होती. गेल्या जूनमध्ये मंगळावर धुळीचे वादळ झाल्यामुळे रोव्हरच्या सोलर पॅनल्सपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचणेही अशक्य झाले. परिणामी, रोव्हर ‘निद्रावस्थेत’ गेलेल्या रोव्हरकडून कोणताही संदेश आला नाही. येथून दिलेल्या आज्ञांचेही ते पालन करीत नव्हते. पुढे धुळीचे वादळ निवळले तरी बॅटऱ्या चार्ज होऊन ते ‘जागे’ होण्याची चिन्हे नाहीत.या मिशनचे प्रधान संशोधन अधिकारी स्टीव्हन्न स्क्वायरेस म्हणाले की, आम्ही आशा सोडलेली नाही; पण रोव्हरचे आयुष्य संपले असावे. तसे असेल तर ते चांगलेच आहे. कारण हे ‘सन्मानाचे’ मरण आहे! कॅलिफोर्निया येथील जेट प्रॉपेल्शन लेबॉरेटरीमधील मिशनचे मॅनेजर जॉन कॅल्लास म्हणाले की, सात महिन्यांत आम्ही ‘अपॉर्च्युनिटी’शी संपर्क साधण्याचे ६०० हून अधिक वेळा प्रयत्न केले आहेत व यापुढेही करीत राहू. हे रोव्हर पुनरुज्जीवित होण्याची शक्यता मावळत असली तरी तर्काला पटेल तोपर्यंत प्रयत्न करीत राहणे, हे आमचे काम आहे.रोव्हरच्या सोलर पॅनल्सवरील धुळीचे थर वादळानेच दूर होऊन ते स्वच्छ होतील आणि बॅटऱ्या चार्ज करतील, अशी आशा होती; परंतु वादळांचा मोसमही सरून गेल्याने आता तसे होणेही शक्य वाटत नाही. मंगळाच्या दक्षिण गोलार्धात आता हिवाळा सुरू होईल, तेव्हा तापमान कमालीचे थंड असेल. गोठणबिंदूच्याही खाली जाणाºया तापमानात बॅटऱ्या, अंतर्गत वायरिंग व संगणक यंत्रणा यांचे नुकसान होऊ शकते. परिणामी, मरणासन्न रोव्हरमध्ये पुन्हा धुगधुगी येण्याच्या आशाही संपुष्टात येतील. (वृत्तसंस्था)स्पिरिट झाले निवृत्तनासा’ने फ्लोरिडामधील केप कॅनेव्हेरालमधून २००३ मध्ये ‘अ‍ॅपॉर्च्यनिटी’ व ‘स्पिरिट’ रोव्हर मंगळावर पाठविली होती. त्यापैकी ‘स्पिरिट’ ठरलेले मिशन पूर्ण करून २०११ मध्ये निवृत्त झाले.

टॅग्स :NASAनासा