गेल्या काही दिवसांपासून सूर्यावर होणाऱ्या मोठ मोठ्या स्फोटांमुळे अवकाश हवामान तज्ञांचे टेन्शन वाढवले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सूर्यापासून निघणारी शक्तीशाली किरणे थेट पृथ्वीच्या दिशेने येत असून याचा परिणाम आपल्या मोबाइल नेटवर्क, सॅटेलाइट आणि वीज व्यवस्थेवरही होऊ शकतो.
सूर्यावर नेमकं काय घडतंय? -सूर्यावरील सनस्पॉट AR4087 हा एक अत्यंत अॅक्टिव भाग असल्याचे बोलले जाते. या ठिकाणी एकाचडी एक जोरद स्फोट होत आहेत. या स्फोटांना 'X-क्लास फ्लेयर्स' म्हटले जाते. 13 मे रोजी पहिल्यांदाच X1.2 फ्लेअर पृथ्वीच्या दिशेने आले. यामुळे तज्ज्ञ सावध झाले. यानंतर पुढच्या दिवशी आणखी एक मोठा फ्लेयर (X2.7) निघाला, याचा अनेक ठिकाणच्या रेडिओ सिग्नल्सवर परिणाम झाला.
कुठे कुठे झाला परिणाम? -दुसऱ्या स्फोटानंतर रेडिओ ब्लॅकआउटच्या घटना घडल्या. विशेषतः अमेरिका, युरोप, आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये काही वेळासाठी रेडिओ कम्यूनिकेशन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. महत्वाचे म्हणजे, जर अशा वादळांची तीव्रता आणखी वाढली तर मोबाईल नेटवर्क, इंटरनेट आणि नेव्हिगेशन सिस्टीम सारख्या आवश्यक दैनंदिन प्रणालींवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेनं सुरू केली तयारी - सौर वादळांचा धोका लक्षात घेत, अमेरिकेने या महिन्याच्या सुरुवातीलाच एक विशेष सराव केला. ८ मे रोजी कोलोरॅडो येथे झालेल्या या सरावात विविध एजन्सींनी भाग घेतला, ज्यात अवकाश आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक गटांचा समावेश होता. या सरावाद्वारे, भविष्यात मोठे सौर वादळ आल्यास त्याचा सामना कशा पद्धतीने करायचा हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.