शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'ध्यानस्थ मोदी' जगाने पाहिले, पण अंतराळातील हे योगी कोण?; NASAच्या फोटोची चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 15:48 IST

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला केदारनाथ दौरा आणि गुहेत लावलेले ध्यान हा देशभरात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला होता. आता योग-ध्यानाचा अजून एक फोटो व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला केदारनाथ दौरा आणि गुहेत लावलेले ध्यान हा देशभरात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला होता. आता योग-ध्यानाचा अजून एक फोटो व्हायरल होत आहे. मात्र या फोटोचा मोदींशी काहीही संबंध नाही. नासाने हा फोटो शेअर केला असून, हा फोटो अंतराळामधील एका ग्रहगोलाचा आहे.  नासाने दिलेल्या माहितीनुसार हा ग्रहगोल पृथ्वीपासून सर्वाधिक अंतरावर असलेला ग्रहगोल आहे ज्याचे छायाचित्र टिपणे शक्य झाले आहे. विशेष बाब म्हणजे या गोलाची आकृती एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या माणसाराखी आहे. हा ग्रहगोल प्लूटोपासून अब्जावधी मैल दूर अंतरावर आहे. या ग्रहाला अल्टिमा थुले असे नाव देण्यात आले असून, त्याचे छायाचित्र नासाच्या न्यू होरायजन्स या यानातून टिपण्यात आले आहे.  अल्टिमा थुले हा ग्रहगोल पृथ्वीपासून 6.4 किमी दूर अंतरावर आहे. या ग्रहगोलाला दोन भागांमध्ये विभाजित करण्यात आले आहे. त्यातील मोठा भाग जो सपाट आहे त्याला अल्टिमा नाव देण्यात आले आहे. तर त्याला जोडून असलेल्या गोल भागाला थुले असे संबोधण्यात आले आहे.  तर या ग्रहगोलाचे दोन्ही भाग जिथे जोडले जातात त्याला नेक असे नाव देण्यात आले आहे. 17 मे रोजी सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात याला 2014 एमयू 69 असे नाव देण्यात आले आहे. वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे हा ग्रहगोल ध्यानस्थ बसलेल्या माणसासारखा दिसतो. ग्रहांच्या निर्मितीवेळीच याची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. 

 नासाचे न्यू होरायझन यान सध्या पृथ्वी पासून 6.6 अब्ज किमी अंतरावर आहे. हे यान आता कइपर बेल्टमध्ये वेगाने प्रवेश करत आहे. तसेच याचा वेग सुमारे 53 हजार किमी प्रति तास एवढी आहे. न्यू होरायझन यानामधूनच अल्टिमा थुलेचे छायाचित्र घेण्यात आले आहे.  या ग्रहगोलाचा पृष्ठभाग लाल असून, त्यावर ज्वालामुखीही असावा, अशी शक्यता आहे. या ग्रहगोलावर शास्त्रज्ञांना मिथेनॉल आणि पाण्याच्या बर्फाचे काही अंशसुद्धा मिळाले आहेत. मात्र येथील बर्फ थोडा वेगळा आहे.  शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अल्टिमा थुलेचा पृष्ठभाग आगीसारखा लाल आहे. त्यामुले इथे जागृत ज्वालामुखी असावा, असा अंदाज आहे. नासाने प्रसिद्ध केलेली छायाचित्रे ही जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला काढण्यात आली होती.   

टॅग्स :NASAनासाInternationalआंतरराष्ट्रीय