शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'नासा'च्या कॅलेंडरमध्ये महाराष्ट्राच्या मुलांना मानाचं पान; कव्हर पेजवर भारतीय सुकन्येला स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 12:19 IST

महाराष्ट्रातील दोन मुलांनी रेखाटलेलं चित्र नासाच्या कॅलेंडरमध्ये

वॉशिंग्टन: नासाच्या वार्षिक कॅलेंडरमध्ये भारतीय मुलांनी मानाचं स्थान पटकावलं आहे. कमर्शियल क्रू कार्यक्रमाच्या अंतर्गत नासानं नववर्षासाठी कॅलेंडर लाँच केलं आहे. यातील सर्व चित्रं लहान मुलांनी रेखाटली आहेत. विशेष म्हणजे या कॅलेंडरच्या कव्हर पेजवर भारतीय कन्येनं रेखाटलेल्या चित्राला जागा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दोघांनी काढलेल्या चित्राचादेखील या कॅलेंडरमध्ये समावेश आहे. नासाचं यंदाचं कॅलेंडर अवकाशातील जीवन या विषयाला वाहिलेलं आहे. या कॅलेंडरचं कव्हर पेजवरील चित्र उत्तर प्रदेशातील नऊ वर्षांच्या दीपशिखानं रेखाटलं आहे. याशिवाय या कॅलेंडरमध्ये आणखी तीन भारतीय विद्यार्थ्यांची चित्रं आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यातील दोघेजण महाराष्ट्राचे आहेत. राज्यातील 10 वर्षांच्या इंद्रयुद्ध आणि 8 वर्षांच्या श्रीहन यांनी एकत्रितपणे तयार केलेलं चित्र या कॅलेंडरमध्ये आहे. अंतराळातील जीवन आणि तिथं चालणारं काम या विषय केंद्रस्थानी ठेऊन दोघांनी चित्र रेखाटलं आहे. तमिळनाडूत राहणाऱ्या 12 वर्षांच्या थेमुकिलिमनच्या कलाकृतीलादेखील कॅलेंडमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्यानं रेखाटलेलं चित्र अंतराळातील खाद्य यावर आधारित आहे. कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आलेली चित्रं अंतराळ विज्ञानाशी नातं सांगणारी आहेत, असं नासानं प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे. अंतराळस्थानकात वास्तव्यात असणाऱ्या अंतराळवीरांचं आयुष्य, त्यांचं काम मुलांपर्यंत पोहोचावं, या उद्देशानं कॅलेंडरची निर्मिती करण्यात आल्याची माहिती नासाकडून देण्यात आली आहे.  

टॅग्स :NASAनासाUSअमेरिका