शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्यांदा PM होणार नरेंद्र मोदी? पाक तज्ज्ञाची मोठी भविष्यवाणी! सांगितलं भारताच्या यशाचं मुख्य कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 14:55 IST

अमेरिकास्थित पाकिस्तानी वंशाचे व्यापारी तथा राजकीय तज्ज्ञ साजिद तरार यांनीही भाजपच्या या विजयासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

भारतात नुकतेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले आहेत. यात भारतीय जनता पक्षाचा तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये मोठा विजय मिळवला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. यातच आता, अमेरिकास्थितपाकिस्तानी वंशाचे व्यापारी तथा राजकीय तज्ज्ञ साजिद तरार यांनीही भाजपच्या या विजयासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते एका शोमध्ये बोलत होते.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान -पाकिस्‍तानी जर्नलिस्‍ट कमर चीमाच्या शोमध्ये साजिद तरार यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत टॉप 5 ग्‍लोबल पॉवर्समध्ये समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा  भारताचे पंतप्रधान होतील. देशातील राजकारणावर त्यांची जबरदस्त पकड आहे. तर विरोधक असंघटित असून त्यांच्याकडे असा कुठलाही नेता नाही, जो पंतप्रधान मोदींना आव्हान देऊ शकेल. याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाते. ज्यांनी स्वतःच्या बळावर भारताला पुढच्या रांगेत पोहोचवले आहे."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि लवकरच टॉप 3 मध्येही येईल," असेही तरार म्हणाले. याच वेली त्यांनी भारतासाठी यशस्वी ठरलेल्या तीन गोष्टींवरही भाष्य केले. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यशस्वी परराष्ट्र दौरे, चंद्रयान आणि ग्लोबल साऊथची प्रगती, हे सर्व भारताला एक मजबूत जागतिक शक्ती म्हणून पुढे नेत आहे."

भारताच्या यशामागचं कारण -तरार म्हणाले, भारताच्या यशामागचं गमक गंभीर शासन आहे. भारताच्या प्रगतीचे सर्वात मोठे कारण म्हणजे पंतप्रधान मोदींसारखा राष्ट्रवादी नेता त्याचे नेतृत्व करत आहे आणि भविष्यातही तेच नेतृत्व करतील. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या एका वक्तव्याकडेही लक्ष आकर्षित केले, ज्यात त्यांनी अमेरिका आता सुपरपावर नाही, असे म्हटले होते. याच बरोबर, आता भारत क्षेत्रीय शक्तीपेक्षाही  अधिक जास्त पुढे गेला आहे, असेही तरार म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका