शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाची आर्थिक नाकेबंदी करा- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 12:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केकमधील SCOच्या परिषदेत सहभागी झाले असून, त्यांनी आज परिषदेला संबोधित केलं आहे.

बिश्केक: पंतप्रधान नरेंद्र मोदी बिश्केकमधील SCOच्या परिषदेत सहभागी झाले असून, त्यांनी आज परिषदेला संबोधित केलं आहे. यावेळी पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला असून, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. सर्वच मानवतावादी शक्तींनी या दहशतवादाशी निपटण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या देशांचं फंडिंग बंद केलं पाहिजे, असंही मोदी म्हणाले आहेत.सध्याच्या युगात चांगल्या कनेक्टिव्हिटी(संपर्काची)ची आवश्यकता आहे. SCO देशांच्या पर्यटकांसाठी लवकरच हेल्पलाइन जारी केली जाणार आहे. आमच्यासाठी शांतीपूर्ण आणि समृद्ध अफगाणिस्तान महत्त्वाचा आहे.SCOमध्ये अफगाणिस्तानच्या विकासाचा रोड मॅप तयार झालेला आहे. मोदींनी जेव्हा दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे सूतोवाच केले, त्यावेळी तिथे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित होते.दहशतवाद पसरवण्यासाठी त्यांना समर्थन, प्रोत्साहन आणि आर्थिक मदत करणारे देश जबाबदार आहेत. 'टेररिज्म फ्री सोसायटी' झालीच पाहिजे. श्रीलंकेत गेलो होतो, तेव्हा दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. दहशतवादाविरोधात एससीओच्या सर्वच देशांनी एकत्र आलं पाहिजे. प्रत्येक देशानं आपल्या भूभागाला सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य मजबूत करणं आवश्यक आहे. हेल्थ केअर, इकॉनॉमिक, पर्यायी ऊर्जेच्या क्षेत्रात काम करावं लागणार आहे. भारत मेडिकल टुरिझम वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी बहुपक्षीय व्यापार प्रणाली गरजेची आहे. अक्षय ऊर्जेचा भारत सहावा आणि सौर ऊर्जेचा भारत पाचवा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान