शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमधील मुक्तीनाथ मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 13:52 IST

काल जनकपूर येथे जानकीमातेचे दर्शन घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पशुपतीनाथ आणि मुक्तीनाथांचे दर्शन घेतले.

काठमांडू- नेपाळमधील पशुपतीनाथ, जनकपूरप्रमाणे अत्यंत प्रसिद्ध स्थान असणाऱ्या मुक्तीनाथ मंदिराला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे. या स्थानाला हिंदू आणि बौद्ध दोन्ही समुदायांमध्ये विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंदिराला भेट देणारे पहिले आंतरराष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी या मंदिरात पूजाही केली. तसेच त्यांनी बागमती नदीच्या काठावर असणाऱ्या पशुपतीनाथाचेही दर्शन घेतले. पशुपतीनाथाचे मंदिर हे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असून नेपाळमधील सर्वात प्राचीन शिवमंदिर म्हणून ते ओळखले जाते. पशुपतीनाथाच्या मंदिरात नरेंद्र मोदी यांनी अभ्यागताच्या वहीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच त्यांना मंदिराची प्रतिकृती भेटही देण्यात आली.मुक्तीनाथ मंदिर हे समुद्रसपाटीपासून 12,172  फूट उंचीवर आहे. या मंदिरात विष्णूदेवांची सोन्याची मूर्ती असून तिचे मुक्तीनाथ म्हणून पूजन केले जाते. या मंदिराला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी पाहुणे आहेत असे नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी कालच सांगितले होते.काल नरेंद्र मोदी यांनी जनकपूर येथे जानकी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते दुपारी नेपाळची राजधानी काठमांडू येथे पंतप्रधान पोहोचले. काठमांडूमध्ये नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी व उपराष्ट्रपती नंदा बहादूर पन यांची त्यांनी भेट घेतली. तसेच नेपाळचे परराष्ट्रमंत्री ज्ञावली यांचीही त्यांनी भेट घेतली. काल संध्याकाळी नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांच्याबरोबर शिष्टमंडळासह विविध विषयांवर चर्चा केली. 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेल्या अरुण 3 प्रकल्पाची पायाभरणीही त्यांच्याहस्ते करण्यात आली. या प्रकल्पातून 900 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्माण होणार आहे.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीJanakpurजनकपूर