शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi birthday : पाकिस्तानच्या मंत्र्यांनी मर्यादा ओलांडली, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केले आक्षेपार्ह ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 13:53 IST

केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानी नेते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून गेल्या महिनाभरापासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका सुरू आहे.

इस्लामाबाद - केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानी नेते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून गेल्या महिनाभरापासून भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 69 व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत. मात्र आजच्या दिवशीही शिष्टाचार न पाळता पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसेन यांनी मर्यादा ओलांडून मोदींवर अत्यंत आक्षेपार्ह ट्विट केले आहे. दरम्यान, फवाद हुसेन यांच्या ट्विटवर सगळीकडून टीका होत आहे. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री फवाद हुसेन यांनी  #Modibirthday या हॅशटॅगसह एक ट्विट केले आहे. आजचा दिवस आपल्याला गर्भनिरोधकांचे महत्त्व समजावतो, असा अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख त्यांनी या ट्विटमधून केला आहे.

दरम्यान, फवाद हुसेन यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अगदी पाकिस्तानमधूनही नेटिझन्स त्यांना खडेबोल सुनावत आहेत. मंत्रिपदावर बसलेला पाकिस्तानस सरकारचा प्रतिनिधी एका स्वतंत्र देशाच्या पंतप्रधानाबाबत असे वक्तव्य करत आहेत. एवढेच शत्रुत्व दाखवायचे असेल तर तंत्रज्ञान, लोकशाहीमध्ये स्पर्धा करा. वाईटसाइट बोलण्यात स्पर्धा करून जिंकणे काही सन्माननीय नाही, असा टोला आएशा अहमद नामक ट्विटर युझर्सने लगावला आहे. चांद्रयानवरील ट्विटवरूनही झाले होते ट्रोलभारताच्या विक्रम लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर क्रॅश लँडिंग झाल्यानंतरसुद्धा फवाद हुसेन यांनी भारताची खिल्ली उडवणारे ट्विट केले होते. त्यावरून त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तान