शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2024 14:34 IST

Narendra Modi America Visit :गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयाने या खरेदीस मान्यता दिली होती.

Narendra Modi America Visit :भारत आणि अमेरिकतेली संरक्षण व्यापारात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, आता भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज 31 MQ-9B (16 स्काय गार्डियन आणि 15 सी गार्डियन) रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट ड्रोन/किलर ड्रोन खरेदी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या ड्रोनची किंमत सुमारे 3 अब्ज डॉलर्स आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेकडून हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज MQ-9B स्काय गार्डियन आणि सी गार्डियन सशस्त्र ड्रोन आणि लेझर-गाइडेड बॉम्ब खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. दरम्यान, आजच्या भेटीत मोदी आणि बायडेन यांनी भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य रोडमॅपचे कौतुक केले. या रोडमॅप अंतर्गत, जेट इंजिन, दारुगोळा आणि ग्राउंड मोबिलिटी सिस्टीम यांसारखी अवजड उपकरणे आणि शस्त्रे तयार केली जाणार आहेत. 

भारत अमेरिकेचा सर्वात मोठा भागीदार क्वाड कॉन्फरन्सनंतर दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका भागीदारी अतिशय मजबूत असल्याचे वर्णन केले. याशिवाय, परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्याचे मार्ग, इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह जागतिक आणि प्रादेशिक समस्या, रशिया-युक्रेन युद्ध आणि मोदींच्या नुकत्याच झालेल्या युक्रेन दौऱ्यावरही द्विपक्षीय बैठकीत चर्चा झाली.

बैठकीत दोन्ही नेत्यांनी यूएस-इंडिया सीईओ फोरमचे सह-अध्यक्ष असलेल्या लॉकहीड मार्टिन आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड या दोन कंपन्यांमधील C-130J सुपर हरक्यूलस विमानावरील टीमिंग कराराचे कौतुक केले. C-130 सुपर हर्क्युलस विमाने चालवणाऱ्या भारतीय ताफ्याच्या आणि जागतिक भागीदारांच्या तयारीला पाठिंबा देण्यासाठी हा करार भारतात देखभाल, दुरुस्ती आणि सुविधा स्थापन करेल. अमेरिका-भारत संरक्षण आणि एरोस्पेस सहकार्यातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. 

'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJoe Bidenज्यो बायडनAmericaअमेरिकाIndiaभारत