शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर...! हा देश 70 हत्ती, 300 झेब्रे अन् घोड्यांसह 700 जानवरं मारणार, ओढवलीय भीषण परिस्थिती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 12:33 IST

...यामुळे, आता नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी येथील सरकारने काही प्राणी मारण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण आफ्रिकन देश नामिबिया सध्या गेल्या 100 वर्षांच्या इतिहासातील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळणेही अवघड झाले आहे. पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी धान्याची गोदामेही रिकामी झाली आहेत. कुठून तरी मदत मिळेल, अशी आशाही नाही, अशा संपूर्ण परिस्थितीमुळे सरकारही हतबल दिसत आहे. यामुळे, आता नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी येथील सरकारने काही प्राणी मारण्याचा निर्णय घेतला आहे.

आता नामिबिया सरकारने लोकांची भूक भागविण्यासाठी हत्ती आणि पाणघोड्यांसह 700 हून अधिक वन्य प्राण्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात, देशाचे म्हणणे आहे की, ते या प्राण्यांपासून मिळणारे मांस नागरिकांमध्ये वितरित करणार आहेत. याचे मुख्य कारण नामिबियातील अन्न संकट आहे.

न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेतील बहुतांश भाग दुष्काळाने त्रस्त आहेत. संपूर्ण प्रदेशात 30 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले असल्याचे युनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्रामने जूनमध्ये म्हटले होते.

हे प्राणी मारले जाणार - हत्तींशिवाय, 300 झेब्रा, 30 पाणघोडे, 50 इम्पाला, 60 म्हशी, 100 ब्लू वाइल्डबीस्ट आणि 100 एलँड मारण्याची देशाची योजना आहे. तसेच, नामिबियातील 84 टक्के अन्न संसाधने आधीच संपली आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी गेल्या आठवड्यातच म्हटले होते.

56,800 किलो मांस सरकारला मिळालं -नामिबियाच्या पर्यावरण, वनीकरण आणि पर्यटन मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, हे प्राणी राष्ट्रीय उद्याने आणि असा भागातून येतील जेथे त्यांची संख्या अधिक आहे. या प्राण्यांना व्यावसायिक शिकाऱ्यांकडून मारले जाईल. काही कंपन्यांना कंत्राटही देण्यात आली आहेत. आतापर्यंत 157 प्राण्यांची शिकार करण्यात आली असून यातून सरकारला 56,800 किलोपेक्षा अधिक मांस मिळाले आहे. हे मांस लोकांमध्ये वितरित केले जात आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, नैऋत्य आफ्रिकन देशांतील दुष्काळाचा परिणाम कमी करणए हा या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे. 

टॅग्स :South Africaद. आफ्रिकाdroughtदुष्काळ