शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

नामिबिया देशाने रचला इतिहास! नेतुम्बो नंदी-नदैतावाह यांची पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 19:22 IST

Netumbo Nandi-Ndaitwah, Namibia first female president : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेतुम्बो नंदी-नदैतावाह यांना ५७% पेक्षा जास्त मते मिळाली, तर पांडुलेनी इतुला यांना २६% मते मिळाली.

Netumbo Nandi-Ndaitwah, Namibia first female president : आफ्रिकेतील नामिबिया या छोट्याशा देशात मोठा बदल घडला. या देशाने नवा इतिहास रचला. नेतुम्बो नंदी-नदैतावाह यांच्या रुपाने या देशाला पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष मिळाल्या. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नंदी-नदैतावाह आता नामिबियाच्या पाचव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून पदावर विराजमान होतील. त्या सत्ताधारी South West Africa People's Organisation म्हणजेच SWAPO पक्षाच्या उमेदवार होत्या. त्यांनी या निवडणुकीत ५७% पेक्षा जास्त मते मिळवली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी पॅट्रियट्स फॉर चेंज (IPC) पक्षाच्या पांडुलेनी इतुला यांनी २६% मते मिळवली.

नामिबियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून राजकारणात सक्रिय

स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असल्याने नंदी-नदैतवाह यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. नामिबियाला १९९० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले.  नंदी-नैदतवाह या नामिबियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून खासदार आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या देशाच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रीपदे सांभाळली आहेत. त्यांचा पक्ष SWAPO म्हणजेच दक्षिण पश्चिम आफ्रिका पीपल्स ऑर्गनायझेशन तेव्हापासून सत्तेत आहेत.

यंदा प्रस्थापितांविरूद्ध होती लाट, पण तरीही...

नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुका SWAPO पक्षासाठी कसोटीच्या होत्या. स्वातंत्र्य मिळवल्यापासून सलग ३४ वर्ष सत्तेवर टिकून राहिलेल्या SWAPO मधील प्रस्थापितांविरूद्ध मोठी लाट होती. त्यांचा प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या IPC ला तरुण पिढीकडून अधिक पाठिंबा मिळत होता. तरुण आयपीसी पार्टीला पाठिंबा देत होते कारण आयपीसी पार्टीने बेरोजगारी आणि सामाजिक असमानतेचा मुद्दा उचलला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन दिसेल अशी विरोधकांना अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. तेथील जनतेने पुन्हा एकदा 'स्वापो'लाच बहुमत दिले.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षElectionनिवडणूक 2024